मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकारला दिलेल्या अल्टिमेटम संपला, मनोज पाटील आजपासून पुन्हा उपोषणास बसणार / manoj jarange

 

सूर्या मराठी न्यूज ब्युरो चीफ

मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्यासाठी मनोज पाटील यांनी शिंदे सरकारला दिलेला अल्टिमेटम आज मंगळवार 24 ऑक्टोंबर ला संपत आहे

मात्र शिंदे सरकारने अजूनही मराठा आरक्षण बाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही

आजचा शेवटचा दिवस हा शिंदे सरकार साठी असणार आहे आरक्षण जाहीर केले नाही तर पुन्हा 25 ऑक्टोंबर पासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसणार असल्याची भूमिका घेतली आहे.

यावेळी पाणी व उपचार घेणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे क** स्वरूपाचे असणार आहे हे आमरण उपोषण तसेच यापुढे सरकारला वेळ वाळून दिला जाणार नाही असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मनोज पाटील म्हणाले की मुख्यमंत्री निर्णय घेतील ते शब्दाला जगणारे आहेत मात्र त्यांनी शब्द पाळला नाही म्हणून 25 ऑक्टोंबर पासून उपोषण बसण्यात तयार आहे.

मग नेत्यांनी आमच्या गावात यायचं नाही गावा गावात मराठा आरक्षण साठी उपोषण संततीने होणार
दिवसभर आणि रात्रीपर्यंत सरकारकडे वेळ आहे.

यापुढे सरकारला एक तास पण वाढून मिळणार नाही सरकार आरक्षण देणार असेल तर आम्ही त्यांच्याशी बोलू ते आरक्षण देणार नसतील तर त्यांना कशाला बोलायचं असे हे पाटील म्हणाले.

त्यामुळे शब्दाला जगून मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला आज दसऱ्याचे मोर्चावर आरक्षण दिले पाहिजे होते मुख्यमंत्र्यांनी पदापेक्षा शब्दाला जास्त किंमत द्यावी असे मनोज पाटील यांनी म्हटले होते manoj jarange

Leave a Comment