Buldhana news | भद्रावती शहरातील तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची काही समाजकंटकांच्या कडुन विटंबना शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाईची तथागत ग्रुपची मागणी.

 

बुलढाणा:- मेहकर येथे तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे भद्रावती शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवरील भगवान तथागत गौतम बुद्धाच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना झाल्याची घटना सोमवारला पहाटेच्या वेळी उघडकीस आली.

असता तथागत ग्रुपच्यावतिने या घटनेचा मेहकर येथे निषेध व्यक्त करीत आहोत. याबाबत मेहकर येथील तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा‌.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर ऐतिहासिक बौद्ध लेणी टेकडीवर भगवान तथागत गौतम बुद्धाचा पुतळा होता.

टेकडीवर हा पुतळा असल्याने तो सहज पणे दिसायचा. घटनेच्या दिवशी या परिसरात पहाटे फिरणाऱ्या काही व्यक्तींना हा पुतळा न दिसल्याने त्यांनी टेकडीवर जाऊन पाहणी केली असता पुतळ्याची तोडफोड झाल्याची आढळून दिसुन आली आहे

Strike of Truck Drivers: ट्रक अन् टँकर चालक संप मागे घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेची बैठक संपली आहे. हीट अॅण्ड रन कायदा तूर्तास लागू होणार नाही

आशा समाजकंटकांचा शोध घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याकरीता मेहकर येथील तहसीलदार साहेब यांच्यामार्फत निवेदन सादर केले.

या घटनेतील दोषी समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा संपुर्ण भारत भर तिव्र छेडण्यात येईल.आसा इशारा प्रशासनाला देण्यात आला..

Buldhana news : यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, कुणाल माने, गौतम नरवाडे,अख्तर कुरेशी, राधेशाम खरात, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, सुधाकर वानखेडे, देवानंद अवसरमोल, सचिन गवई आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..

Leave a Comment