इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
नांदुरा, दरवर्षी प्रमाणे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिवसानिमित्त अमन इंग्लिश स्कूल वडाळी येथे नांदुरा शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांचे सतकार करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अशरफी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष हाजी मुज़म्मिल अली खान होते सत्कार मुर्ती म्हणून शहरातील व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव हजर होते.
सत्कार समारंभ अगोदर सर्व पत्रकार बांधवांनी विज्ञान प्रदर्शन ची पाहणी केली व नंतर क्रिडा उत्सव समारंभचा हि लाभ घेतला
याच पाश्र्वभूमीवर मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने जिल्हा स्तारावर मलकापूर गेस्ट हाउस , बुलढाणा पत्रकार भवन, खामगाव एक स्थानिक वार्ताहर कार्यालयात, जळगाव जामोद गेस्ट हाउस, संग्रामपूर पत्रकार भवन वरवट बकाल, शेगाव गेस्ट हाउस या ठिकाणी पत्रकार बांधवांचे सतकार केले.
कारण असे कि मागील महिन्यात १८ डिसेंबर रोजी बुलढाण्यात मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने मुस्लिम समाजाला आरक्षण ,शिक्षण ,संरक्षण व अन्य मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनाला यशस्वी करण्यात पुर्ण जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी मोलाचे योगदान दिले होते,
माध्यमाद्वारे धरणे आंदोलन च्या मागण्या प्रशासन दरबारी पोहचवण्यात यश मिळाले होते म्हणून मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने जिल्हा स्तरावर पत्रकार बांधवांचे सतकार करण्यात आले,
Buldhananews | या कार्यक्रमात हाजी मुज़म्मिल अली खान, बाबु जमादार, सय्यद इस्माईल सर, जमिल खान, सय्यद अज़ीम सर, फरहान खान, सकलैन शाह, चांद ठेकेदार, अज़हर देशमुख, मज़हर खान उपस्थित होते.