Cakenews:दि.28/05/2024 रोजी बिबी पोलीस स्टेशन हद्दीतील खापरखेड घुले ता. लोणार जी.बुलढाणा या गावातील वैभव प्रल्हाद घुले वय-20 वर्षे याचा वाढदिवस असल्याने त्याने आपल्या मित्रांना आमंत्रित करून गावात रोडवर मोटरसायकल वर boss नाव लिहिलेले चार केक तलवारीच्या साहाय्याने कापुन हातात तलवार घेऊन दहशत निर्माण केली.
व धड्याक्यात वाढदिवस साजरा केला. मात्र त्याचे हेच कृत्य बीबी पोलिसांना समजताच दि.29/05/24 रोजी बीबी पोलीसांनी वैभव घुले यास ताब्यात घेऊन विचारपूस करत त्याच्याकडून 01 तलवार जप्त केली.
व त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे बीबी चे ठाणेदार स.पो.नि संदिप पाटील,पोलीस अंमलदार अरुण सानप, यशवंत जैवाळ यांनी केली.
अलीकडच्या काळात तरुणांमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने DJ वाजविणे, तलवारीने केक कापणे असे कृत्य करून वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार वाढत असून त्यातुन एखादा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Cakenews:त्यामुळे पोलिसांकडून अशा कृत्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वाढदिवसाला तलवारीने केक कापू नका,DJ वाजवू नका,पोलिसांचे आपल्यावर लक्ष आहे.असेच बीबी पोलीसांच्या कारवाई वरून दिसून येते.