हिंगणघाट (प्रतिनिधी):सचिन वाघे
दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी हिंगणघाट येथे मोठ्या प्रमाणावर गाय व वासरांची अमानुष पद्धतीने अवैध वाहतूक करताना एक सहा चाकी टाटा ट्रक (क्रमांक: KA-28-AB-6810) पोलिसांच्या तपासात आढळून आला. यामध्ये एकूण 11 गाई व 4 वासरे, अशा 15 जनावरांना अति दाटीवाटीने, आखुड दोरीने बांधून हलाखीच्या स्थितीत आढळले. या घटनेमुळे प्राणीमात्रांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
हिंगणघाट पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली ट्रक ताब्यात घेऊन पाच आरोपींना अटक केली. आरोपी 1. शेख सलीम शेख रईस (22), अंबिका नगर, धुळे
2. मोहसिन रईस कुरेशी (30), कॉटन मार्केट, धुळे
3. मून्ना शिवलखन यादव (45), बलीया, उत्तरप्रदेश
4. राम बाबू पवार (31), विजापूर, कर्नाटक (ट्रक चालक) 5. बाळा राम खिरू पवार (44), विजापूर, कर्नाटक (ट्रक मालक) पोलीस तपासात समोर आले.
की ही जनावरे गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथून हैदराबाद (तेलंगणा) येथे कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली आरोपींनी दिली. यासाठी कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राची, पशुवाहतुकीची किंवा गाडीची कागदपत्रे त्यांच्या जवळ नव्हती. ट्रकमध्ये जनावरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक फ्रस्टएड किट, चारापाणी वा संरक्षण व्यवस्था नव्हती.या प्रकरणी आरोपींवर खालील कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
Cownews/1960 – कलम 11(1)(ड)महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम, 1976 – कलमे 3(1), 5(अ), 9, 11मोटर वाहन अधिनियम, 1988 – कलमे 181, 130, 177
पोलीसांनी ट्रक व जनावरे जप्त करून पंचासमक्ष जप्ती पंचनामा केला असून, एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ₹28,70,900/- इतकी आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन उपविभागीय अधिकारी सुशील कुमार शिंदे हिंगणघाटचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर डीपी पथक प्रमुख प्रवीण बावणे संतोष गीते सागर सांगोले नरेंद्र आरेकर निलेश सूर्यवंशी यांनी केली पुढील तपास चालू आहे