अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )
Crimenews | गोंडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तर येथे एका नवविवाहितेने सासरच्या मंडळींना नशा आणणारा पदार्थ देऊन चक्क बेशुद्ध केलं. व त्यानंतर नवरीने सर्व सोने दागिने सह पळून गेली होती.

सासरची मंडळी नंतर शुद्धीवर आल्यावर जेणे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. व त्यांनी तत्काळ पोलिसांत जाउन संपूर्ण प्रकरनाची माहिती दिली. व तक्रार दाखल केली.
सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, खरगुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पांडेपुरवा बेदौरा मार्केटमध्ये ही घटना घडली आहे, व जिथे 5 दिवसांपूर्वी एक लग्न झाल्यानंतर एक नववधू घरात प्रवेश केल.
शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST
व तिने सासरच्या लोकांच्या जेवणात नशा आणणारा पदार्थ मिसळून परिवार ला बेशुद्ध केलं व त्या नंतर सर्व सोने चांदी व इतर सामान घेऊन पळ काढला.
व या घटनेत वधूला तिच्या कुटुंबीयांनी आणि एका मैत्रिणीने मदत केल्याचं दावा व सहकार्य म्हटलं जात आहे.
या तक्रारीनंतर पोलिसांनी आपलं शोध मोहीम सुरू केला असता आरोपी वधूला पकडण्यात यश आलं. परंतु तिच्यासह चार जणांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. व या चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे.
व संपूर्ण पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे. व चौकशीत जे सत्य बाहेर आले आहे. ते पाहून तर आपलीच पायाखाली जमीन सरकते.
या प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधे श्याम राय यांनी सांगितलं की, ब्रृजभूषण पांडेचं लखीमपूर येथील एका तरुणीसोबत 17 डिसेंबर रोजी लग्न झालं होतं. व 22 डिसेंबरच्या रात्री नववधूने जेवणात काही पदार्थ मिसळून सासरच्या मंडळींना बेशुद्ध केलं.
व त्यानंतर तिने घरातील सर्व सामान घेऊन पळ काढला. व या घटनेपूर्वी वधूसोबत चार जण सोबत आले होते.
तर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून ताबडतोब तपास सुरू केला आहे. व या तपासासाठी तीन पथकं तयार करण्यात आली. पोलिसांना त्यानंतर यश मिळालं.
Crime News नववधू आणि तिच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली. या चौकशी दरम्यान नववधू आणि तिचे साथीदार जहर खुरानच्या टोळीतील सदस्य असल्याचे उघड झालं. पुढील तपास पोलीस करत आहे. Crime News








