प्रतिक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्युज अकोला.
Crime News अकोला जिल्हातील मूर्तिजापूर :-तालुक्यात येत असलेल्या माना पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रामटेक येथील ३० वर्षिय युवकाने विनयभंग केल्याची तक्रार रामटेक वरुन हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावातील महिलेने माना पोलीसात दाखल केली आहे.
माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रामटेक येथील विक्की गणेश ठाकरे (३०) हा रामटेक पासून हाकेवर असलेल्या नवरंगपूर येथील शिवारात नेहमी प्रमाणे २४ डिसेंबर रोजी बकऱ्या चारण्यासाठी गेला होता, तहानेने व्याकुळ झालेल्या विक्कीने सदर महिलेला पाणी मागीतले आणि तो पाणी पिऊन निघून गेला होता.
परंतु महिलेच्या तक्रारी नुसार आरोपी पाणी पिऊन गेल्यानंतर महिला घरकाम करीत असताना आरोपीने परत येऊन घरात अश्लील चाळे केले.
Crime News यावरुन माना पोलीसांनी आरोपी विरुद्ध भादवी ३५४ अ, ४४८, व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे करीत आहेत.
———————-