press reporter |दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक जफर खान यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

 

 निवडी बद्दल जळगाव जामोद येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत.

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

 

जळगाव जा. दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक मा. श्री जफर खान यांनी आपल्या पत्रकारितेच्या लेखणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनांची माहिती प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्धीस देत असल्याबद्दल व ओबीसी बहुजन महासंघाच्या लोकहिताच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतल्याबद्दल ,

त्यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. निवडी बद्दल जळगाव जामोद येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छाने स्वागत व अभिनंदन करण्यात आले

स्वागतप्रसंगी पोलीस प्रशासनातील मान्यवर
ठाणेदार निलेश झांबरे साहेब, एपीआय पांडुरंग इंगळे साहेब, पी.एस.आय. नारायण सरकटे, पी.एस.आय. अमोल पंडित, पी.एस.आय. शशिकांत दोडके, पीएसआय रंजना आवारे, पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल धीरबस्सी, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत व्यवहारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शेगोकार, पोलीस कॉन्स्टेबल निशिकांत कळस्कार, ए. एस. आय. निलेश पुंडे, सचिन राजपूत, मंगेश सोळंके, सैय्यद तय्यब अली, शेख इरफान, सतीश पातोळे, प्रेमसिंग पवार, अतुल मोहाळे यांची उपस्थिती होती.

Anand Mahindra viral Post : आनंद महिंद्रांकडे व्यक्तीची पैशांची मागणी; मजेशीर उत्तर देत म्हणाले…सर मला एक लाख रुपये द्याल का?

दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक जफर खान पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून त्यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली असून मंगळवार दिनांक ०२ जानेवारी २०२४ रोजी नागपूर येथे होणाऱ्या कलावंतांच्या महामेळाव्याप्रसंगी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल ‌ ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजकुमार घुले, राष्ट्रीय सचिव दर्शना घुले, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेता रहागंडले ,राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख सुभाष तगाळे ,ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाबाराव दुपारे, उपाध्यक्ष बालाजी सुवर्णकार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून.

 

 

press reporter जाफर खान यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Comment