चोरीच्या सात दुचाकीसह आरोपी पती-पत्नीला मलकापूर पोलिसांनी केली अटक..crimenews

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

मलकापूर पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून केलेल्या कारवाईत चोरीच्या सात मोटरसायकलीसह संशयित आरोपी पती-पत्नीला ताब्यात घेऊन अटक केली.

याबाबत मलकापूर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 05/12/2023 रोजी सुधार रामचंद्र मंडवाले वय 61 वर्ष रा. शास्त्री नगर मलकापुर ता मलकापुर जि. बुलढाणा यांनी दिलेल्या रिपोर्ट वरुन मलकापूर पोलिसांनी पोस्टे अप क्र 612/2023 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्हयातील पोलीस विभागाकडून तपास सुरू असताना पोलिसांना खात्रीशीर व गुप्त माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील मोसा घेवुन एक इसम व त्यांचे पत्नी मोसा चोरी करुन घेवुन जात आहे अशी माहीती मिळाल्याने मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून इसमांचा शोध घेवुन त्यास मोसा सह पकडण्यात आले व त्याचे कडुन काही बनारवट नंबर प्लेट व पाना पेनचिस मिळुन आल्याने त्यास पोस्टे मलकापुर शहर येथे आणले व विचापुस केली.

असता त्याने त्याचे नाव श्रीकांत अजबराव आवरे वय 36 वर्ष व त्याचे पत्नीचे नाव सौ. सोनु श्रीकांत आवरे वय 26 वर्ष दोन्ही रा. जवाहर नगर अकोला असे सांगितले त्यांना पोलिसी खाक्याने विचारपुस केली असता त्यांनी शेगाव येथुन 03 मोसा व खामगांव येथुन 01 मोसा व मलकापुर येथुन 03 मोसा असे एकुण 07 मोसा चोरी केल्याचे कबुल केले. मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्यांचे कडुन 07 मोसा किमत. अं 3,50,000/- जप्त करण्यात आले आहे.

तसेच आणखी मोसा जप्त करणे बाकी असुन पुढील तपास पोलीस स्टेशन मलकापुर शहर येथील सपोनि. के.पी. तायडे व डिबी पथक करीत आहेत.

https://www.suryamarathinews.com/buldhananews-3/

पोस्टे हददीत मोसा चोरीचे प्रमाण वाढल्याने मा. सुनिल कडासने सा. पोलीस अधिक्षक बुलढाणा, मा. अशोक थोरात सा, अपर पोलीस अधिक्षक सा. खामगांव, मा. देवराम गवळी सा. उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापुर व पोलीस निरीक्षक विलास पाटील पो.स्टे मलकापुर शहर यांच्या सुचना मार्गदर्शनाखाली डि.बी पथकाचे सपोनि करुणाशील तायडे, पोकॉ/311 आसिफ शेख, पोका/2312 ईश्वर वाघ, पोकॉ/994 प्रमोद राठोड पोका./2732 प्रविण गवई पोका./1013 संतोष कुमावत, पोकॉ/25 गोपाल तारुळकर यांनी सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडली crimenews

Leave a Comment