इस्माईल शेख.बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहिदेपुर या गावात दिनांक 10 डिसेंबर रोजी बावीस वर्षीय सौरभ शिंदे या तरुण युवकाचा धक्कादायक घटना उघडकीस आली असून याबाबत इंदुबाई विजय विकास वय ४५ वर्ष यांनी दिनांक ११ डिसेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
तसेच तक्रार मध्ये म्हटले आहे की जळगाव जामोद तालुक्यामधील सुलज शिवारा मध्ये सात सव्वा सात च्या दरम्यान आरोपी धनराज शेषराव सावंत राहणार मोहीदेपूर बाबुराव भाऊराव सावंत राहणार उसरा, तेजराव दादाराव सोळंके मोहिदेपूर राहणार तालुका जळगाव जामोद या वरील आरोपीनी संगणमत करुन फिर्यादी इंदुबाई विजय शिंदे यांचा मुलगा मृतक सौरव विजय शिंदे वय २२ वर्ष याला आसलगाव येथे नेवुन त्याला आरोपींनी दारु पाजुन आरोपी धनराज शेषराव सावंत चा मोबाईल फुटल्याचे कारणा वरुन कोणत्यातरी धारदार हत्याराने कपाळावर वार मारुन गंभीर जखमी करुन जिवानीशी ठार मारले केले.
येथे क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.suryamarathinews.com/andolan/
अशा मृतक सौरभ शिंदे यांच्या आईने पोलीस स्टेशनला दिलेल्या रिपोर्ट वरुन आरोपींविरोधात कलम 302, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी पकडून जेरबंद केले असुन सदर गुन्हयाचा तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहेत.crimenews