विकृत चाळे करणाऱ्या इसमास गावकऱ्यांनी केलें पोलिसांच्या स्वाधिन crimenews 

 

पोलिसांच्या उदासीन धोरणामुळे घडली घटना.

सप्टेंबर महिन्यातील तक्रारीवर पोलिसांनी केले दुर्लक्ष…

सिंदी रेल्वे….. मागील १ महिन्यापासून आरोपी प्रितम सहारे हा शहरातील नगर विद्यालय समोर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर शाळेतील विद्यार्थ्यांनीना पाहून अश्लील चाळे करायचा. या बाबतची तक्रार २ दिवस आधी शाळेचे मुख्याध्यापक हे पोलिस स्टेशन ला गेले असतां त्यांची तक्रार पोलिसांनी नोदवून घेतली नाही.

व त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र शुक्रवार सकाळीं आरोपींनी सदर चा प्रकार करताना विद्यार्थिनीच्या पालकांनी व नागरिकांनी पाहले व त्याला पकडून पोलिस स्टेशन ला नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिस स्टेशन वर जमलेला जमाव पाहून पोलिस त्वरित अँक्शन मोड वर येत. पिडीत विद्यार्थिनी कडून तक्रार घेऊन आरोपीवर भादवी कलम ३५४ अ व पोस्को कलम १२ अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर शहरत मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढले असून याबाबत सप्टेंबर महिन्यामध्ये नागो परतेकी यांनी शहरातील नेहरू विद्यालय, नगर विद्यालय व विजय विद्यालयाच्या परिसरात टवाळखोर मुलांची वर्दळ वाढली असून शाळेच्या रस्त्याने जाता येताना मुलींना फिल्मी स्टाईलने आकर्षित करून त्यांना फसविण्याचे प्रकार सुरू असल्याची तक्रार सिंदी पोलीस स्टेशनला दिली होती.

परंतु सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या वतीने कोणतीही उचित कारवाई करण्यात आली नाही. दोन दिवसाआधी नगर विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने शाळेसमोर विद्यार्थिनीना पाहून हा आरोपी घाणेरडे कृत्य करत असल्याबाबतची तक्रार बुधवारी देण्यासाठी गेले असता तक्रार न घेता त्यांना हुसकावून लावले. जर वेळीच तक्रार

घेतली असती तर या सदर घटनेला आळा बसला असता.

crimenews सदर घटनेच्या वेळी जनतेचा पोलिसानं बद्दल रोष पाहायला मिळाला. सदर घटना पुन्हा घडू नये याकरता पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष देण्याची मागणी सिंदी वासियांच्या वतीने करण्यात आली आहे…

Leave a Comment