Crimenews | रामटेक येथील एका महिलेचा विनयभंग! माना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शाम वाळस्कर

Crimenews :मुर्तिजापूर तालुक्यातील माना येथून जवळच असलेल्या रामटेक येथील एका महिलेचा बपोरी येथील विकी गणेश ठाकरे या युवकाने विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार रामटेक येथील महिला तिच्या घरी एकटीच असतांना पाहून बपोरी येथील विकी गणेश ठाकरे या युवकाने पीडित महिलेच्या घराजवळ जाऊन त्या महिलेला आवाज देऊन अश्लीश इशारे केले.

विकृत चाळे करणाऱ्या इसमास गावकऱ्यांनी केलें पोलिसांच्या स्वाधिन crimenews 

 

Crimenews यावरून या महिलेने थेट माना पोलीस स्टेशन गाठून विकी गणेश ठाकरे या आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली.यावरून माना पोलिसांनी ३५४/२३ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे करीत आहेत.

Leave a Comment