सिध्दपीठातिल महालक्ष्मी मातेच्या मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा तयाचा वेलू गेला गगनावरी प.पु. तुकाराम महाराज( tukarammaharaj )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

tukarammaharaj:बाळापूर रोड शेगाव येथील श्री सिध्द महालक्ष्मी मंदिराचे प्राणप्रतिष्ठेस वर्ष पूर्ती झाल्याने अविष्कार संस्थेने मोठया उत्साहात सखारामपुर संस्थान चे प.पु. ह.भ.प. तुकाराम महाराज व प.पु. ह.भ.प. श्री गोपाळ महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.

वर्धापन दिना निमित्त पहाटे ५ वा. अभिषेक, स्त्रि सुक्त पठन, पुरुष सुक्त पठण, देवी याग दिपोत्सव नृत्योत्सव, महा आरती, महाप्रसाद वितरण इत्यादि विविध धार्मिक व आध्यात्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प.पु.ह.भ.प. श्री तुकाराम महाराज, ह.भ.प.श्री गोपाळ महाराज, ह.भ.प श्री. रामभारती महाराज, या संतश्रेष्ठी च्या शुभ हस्ते आईची महाआरती करणात आली. आपले मनोगत व्यक्त करतांना श्री तुकाराम महाराजांनी संस्थेच्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले. व ह.भ.प. श्री गजानन महाराज वाघ यांनी इवलेसे रोप लावले, त्याचा वेलू आज गगनावरी गेला, संस्था उत्तोरोतर प्रगती करेल.

आ डाॅ संजय कुटे यांनी पुष्पवृष्टी करत रामभक्तांचे शेगावात स्वागत जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणला,रामभक्तांचा उत्साह (dr SanjayKute )

असा गौरव उद्गार काढला. दिव्यांग मुलांच्या हितासाठी संस्था अविरत कार्यरत आहे. संस्थेनी मतिमंद विद्यालयातील १८ वर्षावरील १० प्रौढ मतिमंद विद्यार्थ्यांचे व्यावसायीक पुनर्वसन करुन त्यांना मानधन सुरु केले हि बाब समाजाला दिशा देणारी आहे. असे प्रतिपादन श्री गोपाळ महाराज व रामभारती महाराज यांनी केले.

सदर वर्धापन दिनास श्री भोजराज पाटील, श्रीमती यशश्रीताई होशींग, श्री. शरदशेठ अग्रवाल, सौ. स्वातीताई वाकेकर, पोलिस निरिक्षक श्री बडगावकर, सौ प्रितीताई शेगोकार, बि.डी.ओ. श्री देशमुख, सौ. प्रेमलताताई सोनोने इ. विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली.

अनोळखी युवकाकडून १४ वर्षीय मुली सोबत जबरदस्ती शारीरीक संबंध,व विनयभंग ( crimenews )

 

tukarammaharaj:वर्धापन दिन यशस्वी होण्या करीता श्री लक्ष्मण खोंड, श्री केशव हिंगणे, श्री. भरत जोशी, श्री रमेशचंद्र धानुका, श्री अंबादास मांडवगडे, अंजुताई अग्रवाल, श्री धनराज राहटे, श्री शार्दुल वाघ, श्री गजानन पेसोडे, राधा राणी सखी मंच व मानेगाव, वरखेड, पिंप्राळा, जवळा, आलेवाडी, बटवाडी, नागझरी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते. महाआरती गायन ह.भ.प.श्री गजानन महाराज वाघ यांनी

tukarammaharaj:केली व सुत्र संचालन प्राचार्य डॉ. श्री गजानन मुंढे व श्री शशीकांत विखे यांनी केले. परीसर सजावट श्री बोरकर, श्री गणेश पाटील, श्री राजेश चव्हाण, श्री प्रसाद सोनोने, राजपूत मॅडम, श्री शेजोळे, सौ. धनोकार, श्री आळशी, श्री पल्हाडे, विजय हिंगणे, गजानन पांढरे, श्री पोटे, श्री पांडे, श्री विनोद चतरकर, श्री अनिल भोमले व सिध्दपिठ महालक्ष्मी मंदिरातील कर्मचारी व मतिमंद विद्यालयातील कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Leave a Comment