देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज -संगीतराव भोंगळ ( chhatrapati shivaji maharaj )

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आदिवासी बहुल भागात पोहचावे या उद्देशाने गेल्या कित्येक वर्षापासून सर्व धर्मिय समाज बांधवांना सोबत घेऊन आदिवासी

बहुल ग्राम वसाडी येथे मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ (राजू पाटील) त्यांचे सहकारी व आदिवासी बांधव ईको पार्क ग्राम वसाली येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतात.

संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी गाव वसाली येथील छ.शिवाजी महाराज इको पार्कमध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

आ डाॅ संजय कुटे यांनी पुष्पवृष्टी करत रामभक्तांचे शेगावात स्वागत जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणला,रामभक्तांचा उत्साह (dr SanjayKute )

सात वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आवरणात झाकून ठेवलेला असताना संगीतराव भोंगळ यांनी सर्वपक्षीय नेते व आदिवासी बांधवांना सोबत घेऊन.

सायन्स इको पार्क गाठून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील आवरण काढून जलाभिषेक करून महाराजांची जयंती साजरी केली होती.

अनोळखी युवकाकडून १४ वर्षीय मुली सोबत जबरदस्ती शारीरीक संबंध,व विनयभंग ( crimenews )

 

सोमवार, १९ फेब्रुवारी २०२४ रोजी देखील सकाळी ११ वा. शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जयंती साजरी केली.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

मागील कोरोना काळात सुद्धा शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून मोजक्या लोकांना सोबत घेऊन सुद्धा शिवजयंती अविरत सुरू ठेवली होती याही वर्षी २०२४ मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी उपस्थित संगीतराव भोंगळ, सरपंच हुसेनभाई पालकर, पोलीस पाटील जुम्माभाई पालकर, नारायण ढगे, दुर्गासिंग सोळंके, राजभाऊ आमटे,श्री वरणकार,धर्मेंद्र इंगळे,संदीप वाभे, संदीप दामदार,पप्पू पठाण,अमित वरपे,स्वप्निल ढोले,योगेश मुरुक, विक्रम निंबोडकर, सिकंदर सिंह, राजु सिंह,भीमा अवचार, भिमा मोहिते,हिरालाल जामळे,लालमन मावस्कर, सोळंके साहेब फॉरेस्ट, राजेंद्र पालकर,अविनाश मावस्कर,रवी मांडलेवी, मंगेश बोळे, उत्तम हातेकर,अजय सोनी, अर्जुन शिवणकर, निखिल वानखडे, वैभव इंगळे वानखडे, अमित पाटील व आदिवासी बांधव मोठया संखेने उपस्थित होते.

chhatrapati shivaji maharaj:गुरुदेव सेवा मंडळाचे शाहीर नारायणराव इंगळे, शोभाताई बोदडे , श्रीकृष्ण हातेकर,नंदू बचे प्रल्हाद वानखडे, समाधान पुंडे,मंगेश बोळे भजन मंडळी उपस्थित होती
सर्वांनी मोठ्या हर्ष-उल्हासात आदिवासी भागात शिवजयंती साजरी केली.

Leave a Comment