डांभुर्णी येथे रोटावेटर मध्ये अटकून ड्रायव्हरच्या शरीराचे तुकडे तुकडे होवुन दुदैवी मृत्यू  ( crimenews )

0
2

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

crimenews:येथील तालुक्यातील डांभुर्णी गावात शेतात रोटावेटर करीत असताना.

ड्रायव्हरच्या मागच्या साईडला तोल जाऊन रोट्याव्हेटर मध्ये अटकून तरूणाच्या शरीराचे तुकडे तुकडे होवुन दुदैवी मृत्यु झाल्याची घटना दुपारीच्या सुमारास घडली असून याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की ,डांभुर्णी तालुका यावल येथील राहणारा विजय जानकीराम कोळी बाविस्कर वय३५ हा रोटावेटर करण्यासाठी शेतात गेलेला असता दिनांक १४ मे २o२४ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मागील बाजूस रोटावेटर मध्ये अटकून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

याबाबत केतन रेवा पालक यांनी दिलेल्या खबर वरून यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची सीआरपीसी १७४प्रमाणे नोंद करण्यात आली असुन,पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल वासुदेव मराठे हे करीत आहेत

सदर मयताचे मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी शिवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews:अत्यंत शोकाकुल परिस्थितीमध्ये डांभुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मयत विजय कोळी यांच्या पश्चात आई वडील भाऊ वहिनी असा परिवार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here