नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी गोर-गरीबांच्या कल्याणासाठी आपणच मुख्यमंत्री व्हाल : आनंद गोसकी (devendrafadnvis)

0
2

 

devendrafadnvis:सोलापूर : देशाचं लक्ष वेधलेल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर येथील देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तसेच रुग्णसेवक आनंद गोसकी यांनी मुंबईत सागर निवासस्थानी राज्याचे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सोलापूरचे टाॅवेल व देवेंद्र फडणवीस यांचं फ्रेम देऊन सत्कार करून अभिनंदन केले.

आपला मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा व उपमुख्यमंत्री अडीच वर्षांचा कार्यकाळ संपूर्ण राज्याने जवळून पाहिला आहे. आपल्या नेतृत्वात महाराष्ट्राने विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

आपल्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात ही अनेक कामे करण्याची संधी मिळेल व आणखीन ताकदीने काम करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना
आनंद गोसकी यांनी म्हटले.

केवळ देवेंद्रजींच्या नावाने अनेकांची कधीच न होणारे कामे वा प्रश्न सहजगत्या निकाली निघाल्याचे आनंद गोसकी यांचा स्वानुभव आहे.

त्याच बरोबर, उपमुख्यमंत्री कार्यालयातून ही खुप सहकार्य मिळाल्याचे गोसकी यांनाही पदोपदी अनुभवास आले.

devendrafadnvis:देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी अनेक गोरगरीबांचे आर्शिवाद आहेत. ते राज्याच्या मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्राच्या नव निर्मितीचा संकल्प सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाही, असंही आनंद गोसकी यांनी त्या भेटीत म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here