Eknathshinde sarkar | शिंदे सरकार पुढे नव्या जोमाने आणि ऊर्जेने काम करणार :-तालुका प्रमुख दिपक पाटील दांदळे.

 

मूर्तिजापूरात शिवसेना शिंदे गटाचा विजयाचा जल्लोष..!

मूर्तिजापूर:- Eknathshinde sarkar : शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला.या बहुचार्चित निर्णयाचे शिंदे गटाच्या शिवसेनेने मूर्तिजापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला.

शिवसेना पक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मान्यता दिली. शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळली असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे मूर्तिजापूर तालुका प्रमुख दिपक पाटील दांदळे यांच्या मार्गदर्शनात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व एकमेकांना पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

Yaval news | अवैध गुटखा वाहतुकीत सर्वात मोठी कारवाई : १ कोटीं १७ लाखाचा मुद्देमाल जप्त. ४ जणांना अटक .१५ दिवसापूर्वी न्हावीत पकडला होता सव्वा पाच लाखाचा मुद्देमाल

यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले.

तर “शिवसेनेचा विजय असो -शिवसेना जिंदाबाद -मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विजय असो अश्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

Eknathshinde sarkar :या वेळी तालुका प्रमुख दिपक पाटील दांदळे, महिला तालुका प्रमुख स्मृती सुतारे, सुनील शिंदे, सुधाकर गोपकर, शरद हेंगड, राजू मेहेरे, उमेश चिंते, अमोल वानखडे, रवी शितोळे, अशोक सुतारे, प्रविण भटकर, गोपाल लाडके आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————
प्रतिनिधी शाम वाळसकर सह ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्युज अकोला.

Leave a Comment