Murtijapurnews | शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शामवाळस्कर

Murtijapurnews: दिनांक ९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पासून शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनाला शिवसेना व राष्ट्रवादीने सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला आहे.

शेतकऱ्यांच्या वीज संदर्भात तालुक्यातील होत असलेले अन्याय बाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख अप्पू तिडके यांनी आधीच आमरण उपोषण पुकारले होते.बरेच मागण्या शेतकऱ्यांच्या तेव्हा वीज वितरण कंपनी यांनी मान्य केले होते.

परंतु आज पुन्हा कामठा,किनखेड,लसणापूर,निंबा,राजुरा घाटे,पिंपळशेडा,खांदला,मोहखेड,कमळनी,धोत्रा व या परिसरातील शेतकऱ्यांना 14 तास वीज भेटत होती.

त्यांनी ते आधारावर हरभरा गेहू ची पेरणी केली परंतु पूर्व सूचना न देता वीज वितरण कंपनी यांनी सहा तास वीजपुरवठा लागू केली आक्रमक झालेले शेतकऱ्यांनी शेतकरी संघटना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली बारा वाजता पासून हे आंदोलन करण्यात आले.

Eknathshinde sarkar | शिंदे सरकार पुढे नव्या जोमाने आणि ऊर्जेने काम करणार :-तालुका प्रमुख दिपक पाटील दांदळे.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अप्पू तिडके, शेतकरी संघटना सुरेश जोगळे,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव रवी राठी,सम्राट डोंगरदिवे,संदीप पाटील जळमकर,पंचायत समिती उपसभापती देवाशिष भटकर,तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष गुलाबराव म्हसाये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

वीज वितरण कंपनीची अभियंता खांडरे यांच्याशी चर्चा सुरू आहे.मात्र तोडगा निघाला नाही.

 

Murtijapurnews: शेतकऱ्यांना न्यायची अपेक्षा आहे.अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन पुन्हा करतील असा इशारा सुद्धा शिवसेनेचे तालुकाप्रमुख अप्पू तिडके यांनी दिला आहे.

Leave a Comment