उमरगा : तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेश दाजी बिराजदार यांनी दि .२१ वार रविवार रोजी तालुक्यातील नुकसान झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली . तसेच व्हंताळ साठवण तलावाच्या फुटलेल्या सांडव्याचीही पाहणी यावेळी त्यांनी केली .
उमरगा तालुक्यात मागील पंधरा ते वीस दिवसापासून पाऊस होत असून मागील आठवडाभरात मात्र पावसाने उग्ररूप धारण केलेले आहे .तालुक्यात सर्वदूर सर्वच मंडळामध्ये मोठ्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे .
सोयाबीन , उडीद , तूर ,ऊस व फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे . तालुक्यातील विवीध गावांच्या शिवारातील शेती पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी यावेळी प्रा . बिराजदार यांनी केली .यासह व्हंताळ येथील सांडव्याला अनेक दिवसापासून गळती लागल्याने त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .त्याचीही पाहणी यावेळी करण्यात आली .
प्रा बिराजदार यांनी राज्याचे कृषिमंत्री ना . दत्ता मामा भरणे यांना मुंबई येथे भेटून धाराशिव जिल्ह्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे रीतसर पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे .
Farmernews /यावेळी बलसुर येथील उपसरपंच अयुब पटेल ,तंटामुक्तीचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव ,वसंतआप्पा साखरे , राहुल सारडा ,बैजू साखरे , बालाजी साखरे , भागवत शिंदे ,काशिनाथ राठोड ,हिराचंद राठोड ,बाळासाहेब उंडरगावे ,आदीसह शेतकरी उपस्थित होते .