घाटबोरी, खामगाव वनपरिक्षेत्राच्या सीमा वरती भागात जंगलाला मोठे आग ( foreshtnews )

 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी आणि त्याच्या लगतच्या खामगाव वन परिक्षेत्राच्या सीमावर्ती भागातील जंगलाला ६ एप्रिल रोजी दुपारी आग लागली.
त्यामुळे लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट झाल्याचा अंदाज आहे.

मात्र या दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ही आग नेमकी कशामुळे लागली ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. देऊळगाव साखर्शा गावाजवळ पिंपरी धनगर परिसरातील जंगलाला ही आग लागली. यामध्ये जवळपास चार एकरातील वनसपंदा नष्ट झाली.

मेहकर तालुक्यातील घाटबोरी वन परिक्षेत्रातील या आगीचे लोण नंतर खामगाव वन परिक्षेत्रातही पसरले. त्यामुळे त्या भागातही नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

आळसणा दोन एरातील उस जाळुन २५ हजाराचे नुकसान ,अज्ञात विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

मात्र वनपाल व्ही. टी. मापारी यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. देऊळगाव साकर्शा बीटचे वनपाल असतानासुद्धा जानेफळ येथूनच ते कामकाज पाहतात.foreshtnews

मात्र या आग लागल्यानंतर त्यांनी घटनास्थळी हजर न होता एका कर्मचाऱ्यास बोलावून त्याच्याकडून माहिती घेतल्याचे स्थानिकांनी सांगितले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र आता सर्व याप्रकरणी घाटबोरी वन परिक्षेत्र अधिकारी ए. बी. येवले यांना विचारणा केली असता आग आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नायगाव देशमुख येथील वन विभागाच्या जमिनीवरील ते अतिक्रमण काढत होते.

foreshtnews: याच कालावधीदरम्यान देऊळगाव साकर्शा, पिंपरी धनगरजवळच्या पट्ट्यात ही आग लागली होती. मात्र त्यांनी त्वरित वन कर्मचारी अंकुश खेनटे यांना संपर्क करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Leave a Comment