शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करा डाँ भास्कर मापारी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ( formernews )

0
2

 

formernews:सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे

, सध्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मार्फत सुद्धा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक झाले आहे, सध्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी बि बियाणे व खते खरेदी साठी पैशांची आवश्यकता आहे

ससून ला घडला खळबळजनक प्रकार ते रक्त बदलले एका खाजगी वेक्तीने ते बाईच कि आईच नेमका काय? ( Pune accdent porsche )

,तर काही शेतकरी आपल्याकडील पीक कर्जाचा भरणा करून लगेच नवीन पीक कर्ज उचलत असतात तसेच काही नवीन शेतकरी सुद्धा शेती उपयोगासाठी पीक कर्ज घेण्यासाठी खरीप हंगामाच्या तोंडावर प्रयत्न करताना दिसत असतात, परंतु आपल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेमार्फत मात्र नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासंदर्भात अध्याप कुठलेही पाऊल उचलले गेलेले नाही,

मान्सून आपल्या देशाच्या वेशी जवळ आलेला असताना सुद्धा अद्यापही केंद्रीय सहकारी बँकेकडून नवीन पीक कर्ज वाटपाविषयी उदासीनता दिसून येत आहे, यामुळे जिल्ह्यसह लोणार तालुक्यातील ग्रामसेवा सोसायट्याना सुद्धा सभासद शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत,

काही शेतकऱ्यांनी तात्पूर्त्या स्वरूपात खाजगी कर्ज काढून जिल्हा को ऑप रेटिव्ह बँकेत कर्ज भरणा केला त्यांना सुद्धा बँकेकडून पुन्हा पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे,एकंदरीतच जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील सहकारी सोसायट्यासह शेतकऱ्यांचे मात्र चांगलेच नुकसान होत आहे,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

नवीन पीक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी बी बियाणे व खते घेण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे प्रचंड अडचणीत आलेले आहेत, डाँ भास्कर मापारी संचालक गणेश विविध कार्यकारी सहकारी संस्था लोणार यांनी हा गंभीर प्रश्न निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे मांडला आहे.

formernews:तसेच जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या प्रशासकांना त्वरित शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याविषयी आदेशित करावे अशी आग्रही मागणी डाँ भास्कर मापारी संचालक गणेश विविध कार्यकारी सहकारी संस्था लोणार यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या कडे ई मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here