मुर्तीजापुर तालुक्यात अंगावर वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू…( formernews )

 

ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्यूज अकोला.

formernews:अकोला :-मुर्तीजापुर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा वीस पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.११ रोजी सायंकाळी ६ ते ६. ३० च्या सुमारास खापरवाडा व टीपटाळा इथे घडली आहे.


मुर्तीजापुर शहरासह तालुक्यात मंगळवार दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकड्यात पाऊस झाला. यावेळी तुळजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे २७ व टीपटाळा येथील शालिग्राम शिवराम डोंगरे ६५ वर्ष हे आपल्या शेतात काम करत असतांना अचानक त्यांच्यावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला.

दरम्यान मुर्तीजापुर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे काही झाडे उन्मळून पडली तर झाडांचे पडझड झाल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठा वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

अमरावती येथे १६ जून रोजी राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळा. ( Teacher )

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली तर पुढील उत्तरणीय तपासणी करिता मृतदेह श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे ठेवण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

formernews:असून घटनेचा पुढील तपास मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनात मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस करीत आहेत.
———————————-

Leave a Comment