राष्ट्रनिर्माता सन्मान सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक गडचिरोली जिल्ह्यातून निवड.
अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.
Teacher:गडचिरोली – महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान संघ प्रणित “शिक्षक सन्मान अभियान” अंतर्गत “राष्ट्रनिर्माता सन्मान सोहळा” 16 जून 2024 ला अमरावती येथे अभियंता भवनात आयोजित करण्यात आलेला आहे.
राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातून सर्वात जास्त, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणारे 7 राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान पुरस्कार , शैक्षणिक व प्रशासनिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य – 1,राष्ट्रनिर्माता जीवन गौरव पुरस्कार,आणि सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य –
शेजारी राहणाऱ्या मुलीच्या घरात घुसून विनयभंग! वासनांध युवकाला पाच वर्षाची शिक्षा ( crimenews )
1 राष्ट्रनिर्माता समाज भुषण पुरस्कार, अश्या 9 व्यक्तींची “राष्ट्रनिर्माता पुरस्कार -2024” साठी निवड करण्यात आलेली आहे.
सदर राज्यस्तरीय राष्ट्रनिर्माता सन्मान सोहळा 2024 साठी सर्वात जास्त गडचिरोली जिल्ह्यातून राष्ट्र निर्माता शिक्षक सन्मान पुरस्कारसाठी
1)मदनलाल आभारे,चामोर्शी 2)सुरजलाल येलमुले,अहेरी 3)निमाई मंडल, चामोर्शी,4)जगन्नाथ बडगे,भामरागड 5)संजय कोंकमुट्टीवार,अहेरी
,6)अविनाश बारसागडे,एटापल्ली 7)चांगदेव सोरते,गट साधन केंद्र,चामोर्शी,यांची निवड करण्यात आलेली आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक व प्रशासनिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणारे रा.ना.सातपुते साहेब, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. चामोर्शी यांची राष्ट्रनिर्माता जीवनगौरव पुरस्कार तसेच सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ठ कार्यासाठी श्री.डॉ.यशवंत दुर्गे, सिटी हॉस्पिटल गडचिरोली यांची ” राष्ट्रनिर्माता समाजभुषण पुरस्कार साठी निवड करण्यात आलेली आहे.
Teacher:महाराष्ट्रातील शिक्षक व समाज बांधवांनी या “विद्यार्थी, शिक्षक व समाज हिताच्या दृष्टिकोनातून आयोजित सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान संघ अभियानाचे संस्थापक अध्यक्ष विजय ढाकुलकर व राज्य कार्याध्यक्ष बापु भोयर सर यांनी केले आहे.