मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातुन वझर आघव ते सावरगाव तेली शेत रस्त्याची शेतकर्यांची मागणी ( formernews )

0
3

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

formernews:देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतकऱ्यांची ओळख आहे.आणी शेतकऱ्यांची रक्तवाहिनी ही शेत रस्ता असते.पण तरी सुद्धा वझर आघाव भुमराळा सावरगाव तेली हा शेत रस्ता पई चालयच्या कामीचा नाही

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

वझर आघाव चे 1960/1961 मध्ये पुनर्वसन झाल्यापासून दुर्लक्षित असुन वझर आघाव येथील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन ही भुमराळा सावरगाव तेली शिवारात आहे.वझर आघाव या गावाला आदर्श ग्राम पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर साहेब यांच्या हस्ते मीळालेला आहे.

तरी सुद्धा हा शेत रस्ता दुर्लक्षित का आहे.हा मोठा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडलेला आहे.निसर्गाचे अस्मानी संकट आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे शेतातील कामासाठी लागणारे मजूर यायला तयार नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे.सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 2021/2022 च्या प्लॅन मध्ये समावेश असलेल्या या प्रलंबीत शेतरस्त्याला मंजूरी देऊन शक्य तितक्या तत्परतेने यावर कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यासाठी लागणारे दान पत्रे शपथ पत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता स्थानिक लोकप्रतिनिधी मार्फत शासन दरबारी जमा केलेली आहेत.

formernews:तेव्हा सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून वझर आघाव भुमराळा सावरगाव तेली शेत रस्ता मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here