प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या आजी आणि आईच्या घरातील सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या नातीसह तिच्या दोन साथीदारांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.
Policenews/असून, चोरी केलेले सोने विकून खरेदी केलेली फोर्ड फिगो कार, बजाज एनएस 200 दुचाकी आणि आयफोन पोलिसांनी जप्त केला आहे.पोर्णिमा इंद्रनील रंगारी (वय 69 वर्षे, रा. महात्मा फुले वार्ड, हिंगणघाट) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 10 जानेवारी 2025 ते 24 ऑक्टोबर 2025 या काळात त्यांच्या घरातील कपाटातील लॉकरमधून दोन सोन्याच्या बांगड्या (60 ग्रॅम) व सुनेचे अंगठ्या, नथ व कानातील टॉप्स (20 ग्रॅम) असा एकूण 80 ग्रॅम वजनाचा, किंमत अंदाजे ₹49,200 चा ऐवज चोरीस गेल्याचे उघड झाले.
Breaking news/या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी फिर्यादीच्या नाती पूर्वा रंगारी (वय 18 वर्षे, शिक्षण बी.टेक., रा. बुटीबोरी) हिला चौकशीसाठी बोलावले असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने सांगितले की, तिने आजी व आईच्या कपाटातून टप्प्याटप्याने सोने चोरी करून तिच्या मित्र वंश प्रमोद राऊत (रा. हिंगणघाट) याला विकण्यासाठी दिले. त्याने ते सोने त्याची आई रूपाली प्रमोद राऊत हिच्या माध्यमातून विकले.

सदर तिघांनी सोने विकून मिळालेले तब्बल ₹7,97,000 हॉटेलिंग व मौजमजा करण्यासाठी वापरले तसेच फोर्ड फिगो कार, बजाज एनएस 200 दुचाकी व आयफोन खरेदी केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपींकडून ही वाहने व मोबाईल जप्त केले असून सोनाराकडून विकलेले सुमारे 80 ग्रॅम सोनेही परत मिळवले आहे.
Goldnews /ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व मा. अनिल राऊत, पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक वानखडे, सपोनि पद्माकर मुंडे तसेच डी.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राजेश शेंडे, पो.शि. आशिष नेवारे, मंगेश वाघमारे व रोहित साठे यांनी केली.
पुढील तपास हिंगणघाट पोलिसांकडून सुरू आहे.


