दिवसाची सुरुवात चांगली असेल, तरच दिवस चांगला जातो असे म्हणतात. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात ही हेल्दी फूड ने करावी.
त्यामुळे आपलं पोट चांगलं राहतं आणि पचनासंबंधित समस्या निर्माण होत नाहीत. त्यामुळे दररोज ब्रेकफास्टला काय खावे, हे आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.
पपई रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. पपई मध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात.
त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यासोबतच इम्युनिटी देखील मजबूत राहते. पपई खाल्ल्याने ब्लोटिंगची म्हणजे पोट फुगण्याची समस्या कमी होते.
सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )
बडीशेपचे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट बडीशेपच्या पाण्याने सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. तसेच वजन कमी होण्यासाठी मदत होते.
हे पाणी प्यायल्याने अपचन आणि पोटातील गॅस कमी होतो. बडीशेपचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बडीशेप टाकाटाका आणि उकळून घ्या.
सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )
हलकेसे कोमट झाले की पिऊन घ्या.
केळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात. केळी खाल्ल्याने एनर्जी वाढते आणि ब्लड शुगर लेवल देखील वाढते.
बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच केळी खाल्ल्यावर पोट व्यवस्थित भरते आणि पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.
healthytips: भिजवलेले ड्रायफ्रूट्स सकाळी रिकाम्या पोटी बदाम, अळशीच्या बिया हे भिजवून खाल्ल्याने स्वास्थ्य सुधारते.यातून शरीराला अनेक पोषकतत्व मिळतात.