Home Breaking News Hingnghat / ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट विद्यालयाचा एस.एस.सी बोर्ड परीक्षेत 100% निकाल.

Hingnghat / ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट विद्यालयाचा एस.एस.सी बोर्ड परीक्षेत 100% निकाल.

0
317

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- एस.एस.सी बोर्ड मार्च 2025 ला घेण्यात आलेला परीक्षेचा निकाल आज दिनांक14/04/2025 मंगळवार रोजी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालय हिंगणघाट येथील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल देऊन शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

एकूण 19 विद्यार्थ्यांनी 90% च्या वर गुण प्राप्त केले असून 75% च्या वर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 54 आहे. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीतील गुण प्राप्त केले आहे. कुमारी यशोदा राजुरकर या विद्यार्थ्याने 95.60% टक्के गुण प्राप्त करून शाळेत पहिला क्रमांक पटकावला.

वाढदिवसाला अंगणातच कुटुंब कार्यकर्ता सह अन्नत्याग; रविकांत तुपकरांचा नवीन संकल्प चर्चेत ( Ravikanttupkar )

तसेच1) यशोदा राजुरकर 95.60 2) देवयानी धोंगडे 94.40% 3) प्रज्ञा महाकाळकर 93.00
4) मंथन खउट 93.00 5) रोशन हुलके 92.60 6)पलक जामुनकर 92.40
7)गायत्री चंदनखेडे 92.40 8) अदिती चामचोर 92.40 9) हर्षल टिपले 92.00
10) वेदांत ब्राह्मणकर 91.60 11)वेदांत कावळे 91.40 12)संस्कृती खोडणकर 91.40
13) विष्णू सातारकर 90.80 14) नील गाखरे 90.80 15) इशा बाकडे 90.60
16) कल्याणी राऊत 90.20 17) क्षितिज तळवटकर 90.20 18) प्रणव किन्हेकर 90.00
19) समीक्षा महाकाळकर 90.00 20) पूर्वज धोटे 89.69 21) वेदांत सोनटक्के,89.40
22) आदित्य गवळी 89.40 23) हर्षल लडी 89.40.

Hingnghat:रोशन हुलके या विद्यार्थ्याने गणित या विषयांमध्ये 100 गुण प्राप्त केले असून यशोदा राजूरकर आणि गायत्री चंदनखेडे या विद्यार्थिनींनी गणित या विषयात 99 गुण प्राप्त केले. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना शाळेने दत्तक घेतले होते. तसेच कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत शिकवणी नसताना सुद्धा 90% च्या वर गुण प्राप्त केले.

ही खास उल्लेखनीय बाब. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय गिरधर राठी( संस्थापक व सचिव हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था हिंगणघाट) अर्पणा रशेश राठी( अध्यक्षा ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट) रशेश राठी( सहसचिव हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था, हिंगणघाट) प्रवीण धोबे( कोषाध्यक्ष) अभिनव जयस्वाल( मुख्याध्यापक ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट) नितीन ढबाले( मुख्याध्यापक ज्ञानदीप विद्यानिकेतन वाघोली) शिल्पा पंकज जयस्वाल ( उप- मुख्याध्यापिका ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट) यांना दिले. तसेच आपल्या सर्व विषय शिक्षक तसेच पालक यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Hingnghat :सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यात ज्ञानदीप विद्यानिकेतन ची परंपरा अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here