प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट: संत तुकडोजी वॉर्डातील कलोडे सभागृह समोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठवून त्यांना दुसरी कडे स्थायी पट्टे द्या या प्रमुख मागणीसाठी संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
संत तुकडोजी वॉर्ड येथील कलोडे सभागृह समोरील शासकीय जागेवरील अतिक्रमण हे संत तुकडोजी वॉर्डातील रहिवाश्यांना अतिशय त्रासदायक ठरत आहे. येथील काही दुकानांमध्ये व झोपडपट्टीमध्ये दारू व इतर नशिले पदार्थ विकण्यात येते. तसेच या रस्त्यावर मुली व महिलांची नेहमीच छेड काढल्या जाते.
अतिशय खराब शब्दात बोलल्या जाते. तसेच कुठल्याही सामूहिक सणाला येथे दारू पिवून शिवीगाळ व भांडणे होता. तसेच झोपडपट्टीमध्ये कुठलीही परवानगी न घेता रात्री १२ वाजेपर्यंत डिजे वाजविला जातो. त्याशिवाय या परिसरात अस्वच्छता राहत असल्यामुळे संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांना डेंग्यू, मलेरियासारख्या रोगाचा सामना करावा लागतो. तसेच घरातील व दुकानातील घाण पाणी रहिवाशांच्या घरासमोर आणून टाकतात.
याबाबत हटकल्यास अंगावर मारायला धावून येतात. हा त्रास नेहमीचाच झाला असून, येथील झोपडपट्टीला दुसरीकडे जागा वा घरे देऊन स्थलांतरीत करा या मागणीसाठी संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली.परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून
आठ दिवसात अतिक्रमन न काढल्यास आक्रमक आंदोलन करू असे निवेदन संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
Hingnghat /यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शिवसेना (उबाठा) जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोबे, दशरथ ठाकरे, माजी नगरसेवक राजू भाईमारे, नितीन भुते, हुकेश ढोकपांडे, दिलीप बालपांडे,राम मेंढे,शरद ढोकपांडे,नितीन कोल्हे,लक्ष्मण राऊत, राहुल झाडे,रमेश राऊत,शीतल राऊत, प्रभा घिये,मेंढे, दम्यंती घुळघाणे, शीतल चेले,उमा भोयर, प्रज्ञा राऊत यांच्यासह संत तुकडोजी वॉर्डातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.