मरनोपरांत केले नेत्र दान मोहन सुरकार
सिंदी रेल्वे शहरातील वर्धा नागरी सहकारी बँकेचे डेली कलेक्शन एजंट अशोक भुते यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.मात्र त्यांनी मंरनोपरांत नेत्रदान केल्याने मेल्यानंतरही ते डोळ्यांच्या रुपाने या पुथ्वीतलावर जीवंत राहणार आहे.
स्थानिक नेत्रज्योती मित्र परिवार संघटनेच्या आणि शालीनी मेघे रुग्णालय सावंगी मेघे यांच्या सहकार्याने स्व.अशोक भुते यांचे नेत्रदान त्यांच्या परिवाराने करुन घेतले.
Hingnghat:मागील काही वर्षांपासून नेत्र ज्योती संघटनेच्या माध्यमातून डॉ लीलाधर पालीवाल हे नेत्रदानासाठी मृतांच्या परिवाराला प्रोत्साहित करीत असुन आज पर्यंत ६९ तात्यांनी नेत्रदान केले असुन सर्वांनी मरनोपरांत नेत्रदान आवर्जून करावे असे आवाहन डा.पालीवाल यांनी याप्रसंगी केले.