चार ऑगस्टला मेहकर येथे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया शिबिरचा लाभ घ्या डॉ. गोपाल बछिरे ( buldhana )

0
1

 

 

लोणार प्रतिनिधि सय्यद जहीर

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवस सप्ताह समाप्ती तसेच भगवा सप्ताह निमित्त शिवसेना बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे आयोजित भव्य महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी नगरपालिकेचे स्वातंत्र्य मैदान मेहेकर येथे विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते माननीय अंबादासजी दानवे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन

होऊन जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्रभाऊ खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाप्रमुख जालिंदरभाऊ बुधवत विधानसभा संपर्कप्रमुख नंदलालजी जाधव, युवा जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कराडे, महिला जिल्हा संघटिका जिजाताई राठोड, यांच्या प्रमुख उपस्थित होत आहे.

 

https://techmaharashtra.in/pikvima/

 

या शिबिरास संभाजीनगरचे एम्स हॉस्पिटल, अल्पाइन हॉस्पिटल, सनशाइन हॉस्पिटल व रुनवाल हार्ट केअर हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर येणार आहेत.

या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, पोटाचे विकार, किडनीचे आजार, डोळ्याचे विकार, मूळव्याध मुलांची आजार महिलांचे आजार व कॅन्सर सारख्या आजारावर मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया होणार आहे. या शिबिरात तपासणीस येणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज पडल्यास हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स द्वारे जाण्या येण्याची व्यवस्था व मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.

buldhana:या महाआरोग्य शिबिराचा लाभ सर्व गरजू जनतेने घ्यावा असे आवाहन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे जिल्हा उपप्रमुख आशिषभाऊ रहाटे, तालुकाप्रमुख लिंबाभाऊ पांडव, लोणार शहरप्रमुख गजानन जाधव सर व मेहकर शहरप्रमुख किशोरभाऊ गारोळे यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here