यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे
Yavalnews:यावल महसुल प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात महसुल पंधरवाडाच्या निमित्ताने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिरासह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात प्रशिक्षण व आदि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
स्व.अशोक भुते मरणानंतरही डोळ्याने राहणार जीवंत. ( Hingnghat )
होते यावल शहरात १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसुल पंधरवाडा या कार्यक्रमांची सुरूवात यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्यासह तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी लाभार्थ्यांचे प्राप्त होणाऱ्या अर्जासाठी योजनादुत या साईट बाबत व ईतर विभागा संदर्भात बैठक घेण्यात आली.
महसुल पंधरवाडाच्या निमित्ताने रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातुन रक्तदान शिबिर घेण्यात आले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळ अधिकारी, , मिलींद देवरे यांच्यासह सुमारे १५ जणांनी रक्तदान केले.
Yavalnews:दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील शासनाने प्रशासनास दिलेल्या ५० हजार अर्ज स्विकारण्याच्या उद्धीष्टातुन ३४ हजार ५०० अर्ज प्राप्त झाले असुन, अर्ज स्विकारण्याचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहीती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली.