प्रतिनिधी सचिन वाघे
Hingnghatnews:हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. पंकज भोयर यांचा पुर्व नियोजित दौरा होता याप्रसंगी हिंगणघाट येथे प्रथम आगमनाप्रसंगी आमदार समीर कुणावार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्यानंतर ते थेट भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुतळा परिसरातील सौंदर्यीकरणाची माहिती कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा,मुख्याधिकारी नगरपालिका हिंगणघाट व संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
या वेळी तेथील रंग रंगोटी,दुरुस्ती करणे, नविन चौथा-या निर्माण करणे, सभोवताली ओटा मोठा करणे, नविन टाईल्स लावणे,येण्या जाण्याचा रस्ता मोठा करणे, नविन स्टील रेलिंग लावणे, नविन झाडें व लाॅन ,पुतळा समोर नवीन कारंजे लावणे, ग्लास मोझक टाईल्स लावणे,डेकोरेटीव्ह काम करणे इलेक्ट्रिक काम करणे व इतर महत्वांची कामे समजवून घेत त्यांना कामाबद्दल योग्य ती सुचना दिली असून या कामाकरीता निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
MurderNews / नवरा कोरोनात गेला, सासऱ्याची नग्न अवस्थेत हत्या, पोलिसांच्या तपासाची सुरुवात
यावेळी त्यांनी आमदार कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळेच हा निधी प्राप्त झाल्याचे आवर्जून नमूद केले तसेच यावेळी नगर परिषद हिंगणघाटला दोन जेटींग मशीन प्राप्त झाल्या आहेत त्या जेटींग मशीनचे लोकार्पण ना.भोयर यांच्या हस्ते संपन्न झाले हिंगणघाट येथे अमृत योजनेतंर्गत २४ हजार चेंबरचे काम झाले असून ते सफाई करण्यासाठी नागपूर वरून भाडेतत्त्वावर जेटींग मशीन आणावी लागत होती.
ही बाब आमदार कुणावार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करत दोन जेटींग मशीन मंजूर करून घेतल्या आणि आज त्या जेटींग मशीन वाहनांचे लोकार्पण झाल्यानंतर आमदार कुणावार यांनी मा.मुख्यमंत्री ,मा.उपमुख्मंत्री तथा नगरविकास मंत्री व पालकमंत्री वर्धा यांचे आभार मानले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचप्रमाणे हिंगणघाट येथे वर्धा येथील सुप्रसिध्द सोनार यांच्या प्रतिष्ठानाचे लोकार्पण ना.भोयर , आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते तथा माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, बाजार समिती सभापती सुधीर कोठारी, अतुल वांदीले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
Hingnghatnews :त्यानंतर ते हिंगणघाट येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर शाळा येथील शासनाच्या नव साक्षर अभियानांतर्गत सुरू असलेल्या वर्गाला भेट देत नव साक्षरांना शुभेच्छा दिल्यात या दौऱ्या प्रसंगी हिंगणघाट येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते