Home वर्धा Renevenews /प्रलंबित रेती घाटांतून अवैध उत्खनन; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रेती माफियांचे मनोबल वाढले?

Renevenews /प्रलंबित रेती घाटांतून अवैध उत्खनन; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रेती माफियांचे मनोबल वाढले?

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : तालुक्यातील अनेक रेती घाटांचे लिलाव अद्याप प्रलंबित असतानाही काही घाटांमधून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेषतः चिंचोलीघाट, पारडीघाट, कवडघाट, शहालगडी परिसर, नांदगावघाट आदी भागांत रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रेती उपसा व वाहतूक होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.crimenews

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महसूल, खनिकर्म विभाग, तसेच स्थानिक प्रशासनाकडून या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे.hingnghatnews

नागरिकांचा आरोप आहे की, काही ठिकाणी पटवारी, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत स्तरावरील संबंधित घटक, महसूल अधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील काही घटक यांच्याकडून आर्थिक व्यवहारातून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.wardhanews

मात्र,दरम्यान, रेती घाटांची लिलाव प्रक्रिया पूर्ण नसताना सुरू असलेला अवैध रेती उपसा शासनाच्या महसुलाला मोठा फटका देणारा ठरत असून नदीपात्राच्या पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होत आहे.

HSCNews/आईच्या जिद्दीने घडवली गुणवंत कन्या; समीक्षा जणबंधूचे सर्वत्र कौतुक

 

अधिकृत लिलाव घेणाऱ्या कंत्राटदारांपेक्षा अवैध घाटांमधून स्वस्त दरात रेती उपलब्ध होत असल्याने भविष्यात अधिकृत रेती घाट घेण्यास कोणीही पुढे येणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Renevenews/या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संयुक्त तपास पथक स्थापन करावे, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि अवैध उत्खनन त्वरित बंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.