Home वर्धा Hingnghatnews /शारीरिक शिक्षणाचा बोजवारा; काम शून्य तरी लाखोंचा पगार!

Hingnghatnews /शारीरिक शिक्षणाचा बोजवारा; काम शून्य तरी लाखोंचा पगार!

0
2

 

अनेक शाळांमध्ये ‘नामधारी’ शारीरिक शिक्षक, विद्यार्थ्यांच्या क्रीडा भवितव्याशी खेळ

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : राज्यातील अनेक खासगी व अनुदानित शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे केवळ कागदोपत्री असल्याचे चित्र समोर येत आहे.

अनेक ठिकाणी संबंधित शिक्षक कोणतेही प्रत्यक्ष क्रीडा प्रशिक्षण देत नसतानाही त्यांना दरमहा लाखो रुपयांचा पगार मिळत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे ही पदे अनेक संस्थाचालकांच्या नातेवाईकांनी किंवा कमेटीतील सदस्यांनी व्यापल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगली आहे.wardhanews

विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी शाळांमध्ये क्रीडा शिक्षणाला महत्त्व दिले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये मैदान, क्रीडा साहित्य आणि नियमित प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे दिसून येते. परिणामी ग्रामीण व सामान्य कुटुंबातील अनेक गुणवान विद्यार्थी खेळ क्षेत्रात पुढे येण्यापासून वंचित राहत आहेत.hingnghatnews

पालक व नागरिकांचा आरोप आहे की, अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षक केवळ उपस्थितीपुरते मर्यादित असून विद्यार्थ्यांना कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात नाही. जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची कामगिरीही अत्यंत कमी असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.school

Hingnghatnews /विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. संबंधित शाळांची तपासणी करून प्रत्यक्ष कार्यरत शिक्षकांची चौकशी करावी, विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे आणि गैरप्रकार करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here