Home वर्धा Mahatmaphule /महात्मा फुले द्विशताब्दी जयंती निमित्त विशेष चित्ररथाचे १३ मे रोजी हिंगणघाटात...

Mahatmaphule /महात्मा फुले द्विशताब्दी जयंती निमित्त विशेष चित्ररथाचे १३ मे रोजी हिंगणघाटात आगमन

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विशेष चित्ररथाचे आयोजन करण्यात आले असून, हा चित्ररथ १३ मे रोजी वर्धा जिल्ह्यात दाखल होणार आहे. हिंगणघाट येथे सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे चित्ररथाचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. Hingnghatnews

या विशेष चित्ररथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे साहित्य, भिडे वाड्याची प्रतिकृती तसेच सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा समावेश करण्यात आला आहे. समाज प्रबोधन, सामाजिक सलोखा व जागृतीचा संदेश देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.wardhanews

या उपक्रमाला सर्व शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांचे प्रेमी नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शहरात चित्ररथाचे मोठ्या उत्साहात स्वागत करावे,

Mahatmaphule /असे आवाहन वर्धा जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष विशाल हजारे, जिल्हा संघटक विनय डहाके, महिला जिल्हाध्यक्ष कविता मुंगळे, शहराध्यक्ष ऋषीकेश मेश्राम, समाजसेवक अनिल भोगाडे, केशव तितारे, जयंता मानकर तसेच महिला शहराध्यक्ष दीपाली रंगारी यांनी केले आहे.