इस्माईल शेख सह अमीन शेख
शेगाव.तळागाळातील सामान्य माणसाला स्वाभिमानाने जगता यावे म्हणून आपल्या आयुष्यात ज्यांनी साहित्याच्या माध्यमातून जनजागृती केली त्या अण्णाभाऊ साठेंमुळेच सामाजिक समरसतेचा पाया समाजात दृढ झाल्याचे प्रतिपादन बा र्टीच्या शेगाव तालुका समता दूत शुभांगी सरकटे यांनी शेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.
सामजिक न्याय विभागाची स्वायत संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. शेगाव येथील मागास वर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात
लोकशाहीर अण्णाभाऊ भाऊ साठे जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेऴी वस्तीगृहाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
बार्टीच्या शेगांव तालुका समतादूत कु शुभांगी हरीभाऊ सरकटे व इतर मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आल्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मागास वर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह शेगांव येथे झालेल्या कार्यक्रमात शासकीय वसतिगृह,( लिपिक प्रभारी गृहपाल )शुभांगी राऊत मॅडम तेथील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रम बार्टीचे महासंचालक सुनील वारे विभाग प्रमुख चव्हाण सर व बुलढाणा प्रकल्प अधिकारी महेंद्र शामदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
कार्यक्रमास सुषमा भोसले सुनिता अग्रवाल या कर्मचाऱ्यांसह रवीना वाहने मीनल इंगळे व इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते