मॅटवरील कबड्डी सामन्याचे पहिल्यांदाच आयोजन
सिंदी रेल्वे Kabaddi: येथील साई क्रिडा मंडळाने शुक्रवारी ता.९ ते रविवार ता.११ दरम्यान म्यु. नेहरू विद्यालयाच्या मैदानावर भव्य राज्यस्तरीय महीला पुरुष कबड्डी सामन्याचे तिनदिवशीय आयोजन केले आहे.
विशेष म्हणजे कबड्डीचे माहेर घर असलेल्या सिंदी रेल्वे शहरात पहिल्यांदाच आधुनिक पध्दत म्हणजे प्रो कबड्डी प्रमाने “मॅटवरील कबड्डी” पध्दतीने सर्व सामने खेळवले जाणार असल्याने हे समाने पाहने सिंदीवासीयांसाठी पर्वनीच ठरनार आहे.
कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात प्रथम पुरस्कार ७७ हजार ७७७ रुपये रोख तर द्वितीय पुरस्कार ५५ हजार ५५५ रुपये रोख तर महीला गटात प्रथम पुरस्कार ४४ हजार ४४४ रुपये रोख तर द्वितीय पुरस्कार ३३ हजार ३३३ रुपये रोख देऊन अंतिम सामन्यात विजेत्या महीला पुरुष संघाला सन्मानित करण्यात येणार आहे.
स्वस्त BMW बाईक हवीये तर आताच फक्त इतक्या रुपयांत घेयून घरी या; तर जाणून घ्या बाईक फिचर्स ( BMW )
याशिवाय वैयक्तिक बक्षिसात संपुर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू,अंतीम सामन्यात उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, पहिली बोनस,पहिली पकड आदी सोबतच प्रेकक्षकांचा आवडता खेळाडू, असे पुरुष व महिला दोन्ही गटातील खेळाडूला रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ९) ला सांयकाळी ६ वाजता होणार असुन याप्रसंगी मिससे इंडिया २०१८ डॉ. रुचाजी सुगंधा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाला सुरेश देशमुख, राजु तिमांडे, शेखर शेंडे, सुनिल राऊत, सुधीर कोठारी, विजय जयस्वाल, केशरीचंद खंगार,रवी बालपांडे, बबन हिंगणेकर, राजु तळवेकर, अजय कलोडे, आशिष देवतळे आदींची उपस्थिती राहणार आहेत.
संपूर्ण स्पर्धेचे लाईव्ह प्रसारन एम.एच.बी.केबल आणि युट्यूब चॅनल वरुन महेंद्र बहेकर करनार असल्याने कबड्डी प्रेमीना घरबसल्या सामने पाहण्याचा आनंद मिळणार आहे.
Kabaddi: स्पर्धेची प्रवेश फी १५०१ रुपये , लेट फी व तक्रार फी २००१ रुपये असुन जास्तीत जास्त कबड्डी संघानी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन साई क्रिडा मंडळाचे अध्यक्ष गंगाधर कलोडे, अशोक चि. कलोडे, अजय कुंभारे,गजानन खंडाळे, सुरज कोपरकर, सागर अंभोरे, चंदन चव्हाण, मुन्ना क्युरेशी ,गौरव कलोडे, पवन कस्तुरे, तारा कोपरकर आदी साई क्रिडा मंडळाच्या पदाधिकााऱ्यांनी केले आहे.