स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन अंतरंग २०२४ संपन्न ( karnjanews )

कारंजा लाड मोहम्मद बेग मिर्झा

स्थानिक स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालय  कारंजा (लाड) येथे,  मा. प्राचार्य  प्रो. डॉ ए. एन. देवरे सर यांच्या मार्गदर्शना खाली दि. २८ व २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.

या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न झाले. या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. ए. एन. देवरे, उद्घाटक आणि मार्गदर्शक म्हणून श्री कुणाल झाल्टे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. अजय कांत, मा. श्री. प्रकाशसेठ गुलेच्छा, मा. श्री. शेखरजी बंग, मा. श्रीमती उर्मिलाताई ठाकूर, उपप्राचार्य डॉ. आर. ए. पाटील, डॉ. एन. जी. जाधव, प्रा. ए. एम. वानखडे, डॉ. के. जी. राजपूत, चंद्रकांत बलंग इत्यादी मान्यवर या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित होते. श्री कुणाल झाल्टे यांच्या हस्ते स्नेहसंमेलन अंतरंग २०२४ चे उद्घाटन संपन्न झाले.

तसेच दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ ला स्नेहसंमेलन समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. ए. एन. देवरे, प्रमुख अतिथी मा. श्री. रवी  निशिकांत परळीकर कारंजा (लाड), मा. श्री. गोपाल कडू तसेच आमंत्रीत मान्यवर मा. श्री मनोहर वासनकर, मा. श्रीमती उर्मिलाताई ठाकूर, चंद्रकांत बलंग  उपस्थित होते.

महाविद्यालयामध्ये दिनांक २८ व २९ फेब्रुवारी २०२४ ला स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्र प्रदर्शनी (विषय भ्रष्टाचार), डिश डेकोरेशन, फ्लॉवर डेकोरेशन, गीत गायन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, आनंद मेळावा, वक्तृत्व स्पर्धा, सोलो व ग्रुप डान्स इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

सारखे भांडण चालू असते रिलेशनशिप मध्ये, तर करा थोडा या गोष्टींचा विचार ( relationship )

या स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांना पुरस्कार प्राप्त झाले.
रांगोळी स्पर्धा:-
प्रथम अंकुश देवकर राऊत बी. ए. भाग ३,
द्वितीय श्रुती रवींद्र मुघल एम. एस. सी. भाग 2 व साक्षी संजय भोसले बी. ए. भाग १,
चित्रप्रदर्शनी:-
प्रथम कोमल साबळे एम. एस. सी.भाग २,
द्वितीय कु. स्नेहा जी गवारे बी. कॉम. भाग १,
डिश डेकोरेशन:-
प्रथम कु. ज्ञानेश्वरी संतोष सावंत, एम. कॉम. भाग 1
द्वितीय कु. खुशबू संजय मेहता बी. एस. सी. भाग 2
फ्लॉवर डेकोरेशन:
प्रथम अंकिता रुपचंद पोटपिटे, बी. कॉम. भाग 3
द्वितीय सतीश अनिल गवारे एम. एस. सी. भाग 2
गीत गायन:-
प्रथम अनुराग सुनील जाधव, बी. एस. सी. भाग 1
द्वितीय प्रतीक विजय कानडे एम. कॉम. भाग 1 व  ईश्वरी दीपक कोल्हे, बी. कॉम. भाग 2
फॅन्सी ड्रेस स्पर्धा:-
प्रथम तुषार भरत घाटे, बी. कॉम. भाग 3
द्वितीय नंदिनी दादाराव सावटे,
वक्तृत्व स्पर्धा:-
प्रथम सार्थक बांन्ते बी. ए. भाग 1
द्वितीय प्रणव ग उपाध्ये बी. ए. भाग ३,
आनंद मेळावा
प्रथम जान्हवी सोनटक्के, बी. एस. सी. भाग 1
द्वितीय सतीश अनिल गवारे एम. एस. सी. भाग 2
सोलो डान्स स्पर्धा:-
प्रथम कु. निमिषा संतोष घारु बी. कॉम. भाग २,
द्वितीय कु. अन्वी नरेंद्र भोयर बी. ए. सी. भाग 2
ग्रुप डान्स:-
प्रथम चेन्नई एक्सप्रेस ग्रुप यामध्ये कु.  खुशी ललित खोना, कु. अन्वी नरेंद्र भोयर, कु. वैष्णवी सतीश जाधव, कु. उत्कर्षा मिलिंद गांजरे, कु. खुशबू संजय मेहता आणि कु. स्नेहा संतोष ढगे
द्वितीय तारवानी सिस्टरस ग्रुप यामध्ये आचल तारवानी आणि चंचल तारवानी इत्यादी स्पर्धक विजय ठरले.

karnjanews:कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्नेहसंमेलन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, स्पर्धेतील सर्व प्रभारी प्राध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, छात्र संघ प्रतिनिधी व सर्व वर्ग प्रतिनिधींनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Comment