कापूस सोयाबीन अनुदानासाठी पळशी ग्रामपंचायत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली.( kurshinews )

 

अनुदानासाठी शेतकऱ्यांचे 650 अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा

kurshinews:कापूस सोयाबीन अनुदानासाठी अर्ज भरताना शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ नये यासाठी तालुक्यातील पळशी झाशी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना आवाहन करून शेतकऱ्यांकडून 650 अर्ज भरून घेऊन हे अर्ज संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात 12 ऑगस्ट रोजी जमा केले.


सद्यस्थितीत संग्रामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापूस सोयाबीन अनुदानासाठी अर्ज भरण्यासाठी नागरिकांची तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एकच गर्दी होत आहे त्यामुळे या गर्दीत मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

पळशी झाशी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन नागरिकांना नाहक त्रास होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून कापूस सोयाबीन अनुदानासाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचे हे अर्ज भरून घेतले तसेच ज्या शेतकऱ्यांना अर्ज भरता येत नाहीत त्यांनाही अर्ज भरून दिले तसेच हे भरलेले अर्ज ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी जमा करण्यात आले.

स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्यावी शिवसेना भगवा सप्ताह मेळाव्यात उमटला सूर ( shivsena )

यावेळी सरपंच पती राहुल मेटांगे, शिवसेना उपतालुकाप्रमुख विजय मारोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय ठाकरे, प्रफुल मारोडे, वैभव तायडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

kurshinews:आमच्या ग्रामपंचायत ने यापूर्वीही विविध योजनांचे कॅम्प शेतकरी तसेच गावकरी हिताचे राबवले आणि यापुढेही ते राबविण्यात येतील यामुळे शेतकऱ्यांना किंवा गावकऱ्यांना त्रास होणार नाही सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे

Leave a Comment