प्रतिनिधि सैय्यद जहीर
Lonarnews:लोणार विकास आराखडा आढावा बैठक संदर्भ लोणार विकास आराखडा समिती ए.डी.पी शर्मा,जिल्हाधिकारी किरण पाटील, पुरातत्त्व विभागाचे अरून मलीक, फॉरेस्टचे राठोड,विभागीय अधिकारी जोगी,तहसीलदार भुषण पाटील, मुख्यधिकारी वि.भा.वराडे यांनी आज लोणार येथे भेट दिली.
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
या भेटीची माहीती कार्यकर्ते यांना मिळाली त्या आमदार सिध्दार्थ खरात यांना दिली असता ते तात्काळ येथे दाखल झाले यावेळी आमदार खरात यांनी समितीशी चर्चा केली यावेळी मी लोणारला लोणावळा करेन अशी भुमिका मी मतदारांना मांडली होती माझ्या या भुमिकेची लोकांनी स्वागत केले व भरभरुन मतदान केले.
यामुळे लोणारला लोणावळा करायचा असेल तर या समितीमध्ये स्थानिक आमदार व खासदार यांचा समावेश करण्यात यावा अशी सुचना यावेळी खरात यांनी दिल्या. तसेच तिर्थक्षेत्र धारतीर्थ सर्वांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी केली.
स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांना विश्वासात घेऊनच विकास झाला पाहिजे यामुळे लोकांच्या समस्या भाविक पर्यटकांची समस्या आपल्याला मांडता येईल. समितीमध्ये समावेश होई पर्यंत अनौपचारिक मला प्रत्येक बैठकीला बोलवण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केली.
विकास आराखडा समितीच्या समावेशासाठी गरज पडल्यास न्यायालयात याचीका दाखल करू व लोणारचा लोणावळा करू असे आमदार खरात म्हणाले.
Lonarnews:यावेळी मा.नगराध्यक्ष भुषण मापारी, उबाठा शहरप्रमुख गजानन जाधव,काग्रेंसचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद, कृषि उत्पन्न बाजार समिति के सदस्य तेजराव घायाळ,राजु बुधवत ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष,प्रा.गजानन खरात, युवा तालुका प्रमुख जिवन घायाळ,गजानन मोरे,शालीक घायाळ,तानाजी मापारी, शे.करामत,एजाज खान,उबेद खान,परविन सरदार, उपस्थित होते.