प्रतिनिधि सैय्यद जहीर
LonarNews:वसंतराव नाईक इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज किनगाव जट्टू या महाविद्यालयाचे यावर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली त्यात प्रथमच यावर्षी मुलांनी सरशी झाल्याने विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी परीक्षा कॉपीमुक्त व सीसीटीव्हीच्या निग्रणीत पार पडल्या गेली सदर काळात परीक्षा शांततेत पार पडल्यामुळे या शाळेची शंभर टक्के उज्वल निकालाची परंपरा कायम राहिली यावर्षी एकूण 87 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यात 06 प्राविण्यश्रेणीत व 60 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व इतर विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले.
Ajitpawar / शेतकरी मेळाव्यातून लाडकी बहीण आणि कर्जमाफीवर पवारांचा कट”
यावर्षी विज्ञान शाखेतून श्री उज्वल श्रीधर राठोड यांने 82.83% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला चैतन्य जायभाये यांने 78.67% गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि हर्षल वानखेडे यांनी 78.33% गुण मिळवून
LonarNews:तृतीय क्रमांक पटकावला आहे त्यामुळे या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आडे सर, प्रा. नागरे सर, प्रा. सोनुणे सर, प्रा. राठोड सर, प्रा. पवार सर, प्रा. वाघमारे सर, प्रा. वैद्य सर यांच्यासह आई-वडिलांना देत आहेत यावर्षी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक गावकऱ्यांमध्ये होत आहे