प्रेमाची नाती ही खरेच खूप हळवी असतात .या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आपुलकी असेल तर ती निभावणे खूप सोपे असते. रिलेशन मध्ये दोन्ही व्यक्तींचा स्वभाव एकसारखा असेल तर मात्र फारसा फरक पडत नाही.
परंतु दोघांपैकी एकजण इमोशनल असेल तर मग मात्र काहीशा अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या कोणत्या गोष्टीमुळे आपला जोडीदार दुखावला जाईल याची भीती वाटते.
काही वेळा तर खूप नाजूक परिस्थिती अशा कपल्स मध्ये पाहायला मिळते. यासाठी आम्ही तुम्हांला नात्यातील काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा नेहमी टिकून राहील.
समजूतदारपणा खूप महत्वाचा आहे.
स्वभावाने इमोशनल असलेल्या व्यक्तीला समजून घेणे खूप गरजेचे असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना राग येवू शकतो.
यावेळी त्यांना खूप जास्त समजून घेणे गरजेचे असते.बरेचदा आपला जोडीदार सारखा इमोशनल होतो म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो व त्यामुळेच नेमके वादाला फाटे फुटतात.
त्यासाठी अशा वेळी आपल्या जोडीदाराला अजिबात एकटे पडू देवू नका. त्यांच्या भावनांचा अपमान करू नका. प्रत्येक गोष्ट त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा.
प्रेमाने जोडीदाराचे मन जिंकावे.
प्रेम ही अशी गोष्ट आहे,ज्यामुळे सगळं जिंकता येते.त्यामुळे तुमचा जोडीदार इमोशनल असेल तर त्याला वेळोवेळी आपले प्रेम शेअर करत जा. त्याला गिफ्ट देत जा, कधीतरी एखादे सरप्राईज देत जा.
आपल्यासाठी ती व्यक्ती किती महत्वाची आहे,हे त्याला पटवून देत जा.कारण इमोशनल व्यक्तीला फक्त प्रेमाची गरज असते,ते मिळाले की त्या व्यक्तीचा मूड सांभाळणे खूप सोपं असते.
आपल्या जोडीदाराची बाजू समजून घ्या.
जेव्हा आपला जोदार खूप हळवा होतो,तेव्हा त्याला राग आलेला असतो. यावेळी त्याला ज्या गोष्टीचा राग आलेला असेल, ती गोष्ट त्याला नीट समजून सांगा.बहुतेकदा आपल्याला नको असलेल्या गोष्टी कराव्या लागतात.
लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Love: एखाद्या वेळेला काही गोष्टी हळव्या करून जातात. मग खूप रडू येते आणि खूप बेचैन वाटू लागते. अशावेळी आपल्या जोडीदाराजवळ बसा त्याची मनस्थिती सांभाळा