खामगाव स्थानिक.विश्राम भवन येथे.एम.आय.एम.पार्टी.ची जिल्हाआढावा बैठक संपन्न M.I.M

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

खामगांव :-  M.I.M  एम.आय.एम पार्टीची जिल्हा आढावा बैठक दि. २५/१२/२०२३ रोजी स्थानिक विश्राम भवन, खामगाव येथे संपन्न झाली, ही बैठक महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांच्या आदेशानुसार घेण्यात आली.

या बैठकीत संपुर्ण जिल्ह्यातील शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष या कामकाजाचा आढावा बैठकीत हजर होते. निवडणुकीचे वारे असल्या कारणाने विदर्भाच्या दौ-यावर महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांचा भव्य सत्कार दि. १७/१२/२०२३ रोजी खामगाव एमआयएमच्या वतीने करण्यात आला होता.

( Crimenews )37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यातील विदर्भ दौ-यासंदर्भात आदेश दिले होते. या आढावा बैठकीला विदर्भ अध्यक्ष शाहीर रंगूनवाला यांनी संबोधले. सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्यांनी कसे पक्ष कार्यकर्ते वाढवायचे? शाखा कशी स्थापन करायची? हैदराबाद मध्ये ७ सीट कशा निवडून आणल्या? व त्यासाठी कसे काम केले ? याबाबत त्यांनी सांगितले,

महाराष्ट्र महासचिव अब्दुल नाजीम यांनी म्हटले की, पार्टीत इमाते इतबारे काम करणाऱ्यांना स्थान राहील व पार्टीचे काम न करणा-यांची हकालपट्टी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

M.I.M यावेळी एमआयएम पार्टीचे बुलडाणा जिल्ह्याचे दोन्ही दानीश शेख व डॉ. मुबीन खान यांची भाषणे झाली. यावेळी संचालन अॅड. रियाजउद्दीन कादरी व खामगाव तालुकाध्यक्ष रफीक अरब यांनी केले.

तर आभार प्रदर्शन खामगाव शहर अध्यक्ष आरिफ पहेलवान यांनी केले.

Leave a Comment