प्रतिनिधी सचिन वाघे
वर्धा (जिमाका) – महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध स्वरूपाच्या कर्ज योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
अनुदान योजना:या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी 50 टक्के म्हणजेच 25 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळते, ज्यावर बँकेच्या नियमानुसार व्याज आकारले जाते. हे कर्ज तीन वर्षांच्या आत परतफेड करावे लागते.
बिज भांडवल योजना:महामंडळाच्या भाग भांडवलामधून राबवली जाणारी ही योजना असून, 50 लाख रुपयांपर्यंतचे प्रकल्प मंजूर होतात. यामध्ये 20 टक्के कर्ज महामंडळामार्फत देण्यात येते आणि या कर्जावर फक्त 4 टक्के व्याज आकारले जाते. यासोबतच पीएमएजेवाय अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत अनुदानही दिले जाते.
थेट कर्ज योजना:या योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी महामंडळाकडून 50 टक्के मर्यादेत कर्ज दिले जाते. हे कर्जदेखील फक्त 4 टक्के दराने उपलब्ध असून, ते भाग भांडवलातून दिले जाते.
पात्रता:अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असावा
अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असावे
वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे अर्जदार जिल्ह्यातील रहिवासी असावा
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे:
जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, घरटॅक्स पावती, बँक पासबुक, व्यवसायाचे कोटेशन आणि पासपोर्ट साइज फोटो.अर्ज करण्याची प्रक्रिया: पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या महादिशा पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सादर करावा.
mahatma phule/या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल टाकावे, असे आव्हान महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांनी केले आहे.