Home वर्धा Sscbord/जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर श्रावणीची भरारी

Sscbord/जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर श्रावणीची भरारी

 

97.80 टक्के गुणांसह हिंगणघाट तालुक्यात प्रथम; वैज्ञानिक बनण्याच्या स्वप्नाला आमदार समीरभाऊ कुनावर यांची साथ

 

प्रतिनिधी सचिन वाघे

 

हिंगणघाट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच हिंगणघाट शहरातील नगरपरिषदद्वारा संचालित जी.बी.एम.एम. हायस्कूलच्या विद्यार्थिनी कु. श्रावणी रूपेश पराते हिने 97.80 टक्के गुण मिळवत हिंगणघाट तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर तिने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.schoolnews

 

श्रावणीचे वडील कपड्याच्या दुकानात काम करतात, तर आई गृहिणी आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही अभ्यासावरील निष्ठा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि मोठे स्वप्न पाहण्याची जिद्द यांच्या बळावर श्रावणीने यशाचा हा मानाचा टप्पा गाठला. तिच्या यशामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.hingnghatnews

आपल्या यशाचे श्रेय देताना श्रावणीने जी.बी.एम.एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक फुटाणे सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मनःपूर्वक आभार मानले. शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेचे शैक्षणिक वातावरण आणि पालकांचे मोलाचे पाठबळ यामुळेच हे यश शक्य झाल्याचे तिने सांगितले.

भविष्यात वैज्ञानिक बनून संशोधन क्षेत्रात कार्य करण्याची श्रावणीची इच्छा असून देशासाठी नवे संशोधन आणि समाजोपयोगी कार्य करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या या ध्येयाने प्रभावित होत हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तसेच तिच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पालकत्व स्वीकारत तिला दत्तक घेण्याचा संवेदनशील निर्णय त्यांनी जाहीर केला.

श्रावणीच्या यशाबद्दल तिचा विशेष सत्कार आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेच्या शिक्षण सभापती पल्लवी सुशांत बाराहाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

Renevenews /प्रलंबित रेती घाटांतून अवैध उत्खनन; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रेती माफियांचे मनोबल वाढले?

 

सत्कार कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, उमेश तुळस्कर, माजी खासदार सुरेश वाघमारे, शिक्षण समिती सदस्य अंकुश ठाकूर, सोनू गवळी, सुनील मोहता, अतुल नंदागवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी श्रावणीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Sscbord /श्रावणी पराते हिच्या या यशामुळे जी.बी.एम.एम. हायस्कूल तसेच संपूर्ण हिंगणघाट शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तिची यशोगाथा अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.