सिंदखेड राजा परिसरात एमआयडीसी उभारून युवकांच्या हाताला रोजगार द्या ( MIDC )

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे महेश भय्या डोंगरे पाटील यांची मागणी

 

MIDC: 12जानेवारी ला छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक राजे जाधव यांच्या माध्यमातून माननीय महेश भैया डोंगरे पाटील मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक यांच्या कडे मागनी करण्यात आली होती.

सिंदखेड राजा परिसरात एमआयडीसी (MIDC) उभारून युवकांच्या हाताला रोजगार द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे महेश भय्या डोंगरे पाटील यांनी केली आहे .

मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा कोणाला नाही हे ही आता मोदी ठरवणार का?”; मला मंदिरात जाण्यापासून का रोखले ( Rahul Gandhi )

सदर निवेदनात म्हटले आहे की,मातृतीर्य सिंदखेड राजा शहराचा स्वतंत्र परिचय देण्याची गरज नाही,परंतु ज्या शहराने स्वराज्याची प्रेरणा दिली तेथील विकासाचा अनुशेष कायमच वाढत चालला आहे.

शहरातील विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागावे यासाठी आम्ही सरकार दरबारी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. शहर विकासाच्या दृष्टीकोनातून युवक युवतींना बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी तरुण मुलामुलींना त्यांच्या पायावर उभ करण्यासाठी हाताला काम मिळाल्यानंतर नशापाणी पासून प्रवृत्त करण्यासाठी व भावी आयुष्य सुरळीत व चांगले जाण्यासाठी त्यांच्या हाताला काम देणे महत्वाचे आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

MIDC: त्याकरिता सिंदखेड राजा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर एमआयडीसी (MIDC) उभारून त्यांच्या हाताला रोजगार द्यावा,अशी मागणी महेश भय्या डोंगरे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन केली आहे.

Leave a Comment