खामगाव एमआयडीसीतील पुन्हा एका इंडस्ट्रीजला लागली मोठी आग ( midcnews)

 

आगीत सरकी व मशिनरी जळून कोट्यावधी रुपयाचे नुकसान

खामगाव – एमआयडीसी भागातील गोयनका यांच्या अथर्व इंडस्ट्रीजला आग लागल्याची घटना आज ६ एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेदरम्यान घडली.

या घटनेची माहिती मिळताच खामगाव नगर परिषदेचे अग्नीशमन दल एमआयडीसीमधील गोयनका यांच्या अथर्व इंडस्ट्रीजमधे दाखल झाले होते.

नगर परिषद अग्नीशमन दलाचे कर्मचारी हे आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. सरकी असल्यामुळे आजीने रुद्ररूप धारण केले.

रविभाऊ जिंकल्यावरच चप्पल घालणार, तुपकर समर्थकाचा अनोखा संकल्प! एक हाताने कार चालविणारा सारथी म्हणतो गुलाल घेतल्यावरच इलाज, सिंदखेडराजा मधील कार्यकर्त्यांचा जिद्दबाज प्रचार (Ravikanttupkar)

आग भीषण असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता मलकापूर, नांदुरा,शेगाव, जळगाव जामोद, बुलढाणा व इतर ठिकाणावरून अग्निशामक दलास प्राचारण करण्यात आले होते.

सदर आगीत सरकी मशनरी इतर साहित्य जळून कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले. सदर आग कशामुळे लागली समजले नाही.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

midcnews:एमआयडीसीमधे स्वातंत्र्य अग्निशामक दलाचे वाहन नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे..

Leave a Comment