देऊळगावराजा सुरेश हुसे
देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे खल्याळ गव्हाण येथे आज 31 रोजीखडक पूर्णा जलाशयाजवळ अवैध रेती उत्खनन करणाऱ्या दोन बोटी व फायबर पकडण्यात आल्या व नंतर स्फोटके ( जिलेटीन) लावून फोडण्यात आल्या व नष्ट करण्यात आली . सदर एक बोट व एक फायबर खल्याळ गव्हाण व दुसरी बोट ही सुलतानपूर येथील आसल्याची माहिती आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी(SDM) समाधान गायकवाड यांचे पथकाने केली सोबत मंडळ अधिकारी हिरवे, तलाठी उदार, तलाठी हांडे, तलाठी डोईफोडे व तलाठी बुरकुल, वाहन चालक कैलास चव्हाण, कोतवाल बंगाळे हे होते.
तसेच दुसरी कारवाई मौजे डिग्रज बु. येथे अवैध रेती उत्खनन करणारी एक बोट पडण्यात आली. सदर बोट स्फोटक लावून उडवून देवून नष्ट करण्यात आली.
सदर कारवाई ही उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड व तहसीलदार श्याम धनमाने यांच्या पथकाने केली. सोबत मंडळ अधिकारी घुगे, तलाठी तायडे, तलाठी तागवाले, तलाठी सानप, वाहन चालक चव्हाण, उबाळे, कोतवाल लोखंडे होते. minor mineral