मुंबई येथे आझाद मैदानावर १४ जुलै २०२५ रोजी राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थ्यांचा भव्य छत्री मोर्चा घेण्याचा निर्धार (morchanews)

0
1

 

विकी वानखेडे

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना जळगाव जिल्ह्यातर्फे मा. आपले प्रशिक्षणाचे आधारस्तंभ तुकाराम बाबा यांनी सर्व युवा प्रशिक्षणातील संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या १४ जुलै २०२५ च्या मुंबई येथील मोर्चाच्या नियोजनासाठी सुरु केलेल्या सवांद दौऱ्याची सुरवात जळगाव येथून करण्यात आली.

दि. १२जुलै २०२५ रोजी जळगाव येथे युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे मा. जिल्हाध्यक्ष साबिरा तडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक मा. तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीला सुरवात झाली.

याप्रसंगी श्री तुकाराम बाबा यांचा भव्य सत्कार जळगाव
जिल्ह्याच्या वतीने युवा प्रशिक्षणार्थ्यांकडून करण्यात आला. बैठकीला प्रमुख विषय म्हणजे येणाऱ्या आगामी काळात प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी रोजगार कसा मिळवून द्यावा हा सर्वात मोठा विषय यावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.

मा. सरिता ताई यांनी मनोगत व्यक्त करताना प्रशिक्षणार्थी यांना विषेश संदेश या ठिकाणी दिला ते असे कि, जळगाव जिल्ह्यांनी सर्वात अगोदर प्रशिक्षणार्थीच्या हितासाठी झटणारे पहिले एकमेव संघटन म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना. तरी आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी जळगाव चे नाव सदैव स्मरणात राहील, तसेच उंचशिखरा पर्यंत

पोहोचेल यासाठी प्रशिक्षणार्थीनी रोजगाराच्या मागणीसाठी व न्याय हक्कासाठी मुंबई येथे तत्पर उपस्थिती दर्शवावी. तसेच १४ जुलै ला होणाऱ्या महामोर्चासाठी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. येणाऱ्या १४ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या मुंबई विधानभवनावर एकदिवशीय छत्री आंदोलणासाठी मोठ्या संख्येने एकजुटीने हजर राहावे असे संबोधन केले.

पुढिल मनोगत व्यक्त करताना उपाध्यक्ष हर्षाली साळुंखे यांनी म्हटले की, जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थीना मुंबई येथे विधानभवनावर आणण्याचे नियोजन व भविष्यात येणाऱ्या रोजगार विषयी व्यथा मांडल्या व पुढील कामे कसे चिकाटीने करता येईल त्यावर मनोगत व्यक्त केले.

तसेच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे मा. तुकाराम बाबा यांनी बैठकीला नवीन प्रारूप निर्माण केले, बैठकी दरम्यान प्रशिक्षणार्थी यांनी रोजगारासंबंधी

कश्या पद्धतीचे कामे जिल्ह्याच्या नेतृत्वानी केले पाहिजे हे त्यांनी सांगितले, प्रत्येक तालुक्यात जाऊन पदाधिकारी यांनी प्रशिक्षणार्थी पर्यंत पोहचण्याचे काम केले पाहिजे, आंदोलनासंबंधी वर्तमानपत्रात जाहिराती, प्रत्येक तालुक्यात दोन बॅनर, आणि जिल्ह्याच्या स्थानिक स्तरावर जाऊन बैठकी घेण्याचे आणि आंदोलनासंदर्भात जनजागृती करावी. येणाऱ्या १४ जुलै २०२५ रोजी मुंबई मध्ये होणाऱ्या एकदिवशीय छत्री मोर्चा मध्ये जळगाव चे प्रशिक्षणार्थी एकजूट झाले पाहिजे, किमान निम्मे प्रशिक्षणार्थीची साथ असली पाहिजे अशी ग्वाही प्रशिक्षणार्थी कडून करून घेतली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी पाटील, मोहिते यांनी केले. याप्रसंगी मयूर पाटील, भरत चौधरी विकी वानखेडे हेमंत पाटील, समीर तडवी, गौरव जोशी, देवयानी जगताप, हर्षाली कोळी, सुधीर पाटील,संदीप साळुंखे, आकाश सोनार, तुषार शिंदे ,महेंद्र सर ,संतोष पाटील, विनोद चौधरी ,निकिता तायडे ,योगिता साळुंखे ,शेखर पाटील

चे तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील सगळे प्रमुख पदाधिकारी, महिला-भगिनी उपस्थित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here