मोझरी येथे पुण्यतिथी महोत्सवासाठी अनिल उंबरकार यांची निवड /mojhari 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव : समाज हिताचे व वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचारांचे बुलढाणा जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल येत्या दोन नोव्हेंबरला गुरुकुंज मोझरी येथे पुण्यतिथी महोत्सवात शेगाव येथील पत्रकार अनिल उंबरकार यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

७ ऑक्टोंबर रोजी झालेल्या सभेचे अध्यक्ष प्रकाश महाराज वाघ केंद्रीय प्रचार सेवाधिकारी, दामोदर पाटील गुरूजी उपसर्वाधिकारी तथा सर्व मा. सदस्य केंद्रीय प्रचार विभाग समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली.

त्या नुसार बुलढाणा जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यात हिताचे व वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचारांचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुण्यतिथी महोत्सव २०२३ करिता पत्रकार अनिल उंबरकार यांची निवड करण्यात आली.

त्यानिमित्त २ नोव्हें रोजी सकाळी १० वा. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव ग्रामगीता सभा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे पत्रकार अनिल उंबरकार यांचा सत्कार करण्यात येणार आहे.यासंदर्भात केंद्रीय प्रचार विभाग सचिव तथा राष्ट्रीय किर्तनकार सुशिल महाराज वणवे यांनी पत्रकार अनिल उंबरकार यांना पत्राद्वारे कळविले आहे.

तसेच अ भा श्रीगुरुदेव सेवा मंडळ बुलढाणा जिल्हा सचिव पदाची जबाबदारी सुध्दा अनिल उंबरकार सांभाळत आहेत. / Mojhari

Leave a Comment